सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! कार्यकर्त्यांना संधी; ZP मध्ये 5 अन् पंचायत समितीमध्ये 2 स्वीकृत सदस्य घेणार? मुख्यमंत्र्यांना पत्र
  • बातमी! क्रॉम्रेड पानसरेंच्या हत्याप्रकरणातील सर्वच 12 आरोपींची सुटका; हायकोर्टाकडून तिघांना जामीन
  • : वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी कसं, राज ठाकरेंचे उद्धव ठाकरे, शरद पवारांसमोर निवडणूक आयोगाला धडाधड प्रश्न
  • मतदान कुणाला जातं हेच कळतं नाही; उद्धव ठाकरेंचे निवडणूक आयोगाला रोखठोक सवाल
 शहर

पूरग्रस्त नागरिकांसाठी अवामी महाज,आझम कॅम्पसची मदत रवाना

डिजिटल पुणे    13-10-2025 13:04:32

पुणे: महाराष्ट्रातील मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर 'अवामी महाज' सामाजिक संघटना,महाराष्ट्र कॉसमोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी, हाजी गुलाम मोहम्मद आझम एज्युकेशन ट्रस्ट आणि डॉ.पी.ए.इनामदार विद्यापीठ या संस्थांतर्फे  पूरग्रस्त नागरिकांसाठी अन्नधान्य,भांडी,ब्लँकेट्स, कपडे,पिण्याचे पाणी, स्वच्छता साहित्य आणि वैद्यकीय मदत यांचे वितरण करण्यात आले. ही मदत मोहीम डॉ. पी.ए.इनामदार विद्यापीठाचे कुलपती डॉ.पी.ए.इनामदार आणि संस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती आबेदा पी. इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर,बीड,नांदेड,लातूर,उदगीर या परिसरात पार पडली.

यासाठी तयार करण्यात आलेल्या संचात (किट)मध्ये ६० पेक्षा अधिक जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे.या कार्यासाठी तीन स्वतंत्र पथके तयार करण्यात आली होती. त्यांनी महाराष्ट्रातील विविध पूरग्रस्त जिल्ह्यांमध्ये जाऊन मदत पोहोचवली.

या उपक्रमात आझम कॅम्पस आणि अवामी महाज संस्थेचे स्वयंसेवक तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. मशकूर शेख, साबीर शेख, गौस उर्फ बबलू सय्यद, सादिक लुकडे आणि इतर सदस्यांनी पूरग्रस्त नागरिकांना मदतसाहित्य वाटप करून सामाजिक जबाबदारीचे उदाहरण घालून दिले.या प्रयत्नातून संस्थांनी मानवता,सामाजिक बांधिलकी आणि सहकार्याची भावना दृढ केली असून भविष्यातही कोणत्याही आपत्तीच्या काळात लोकसेवेच्या कार्यात अग्रेसर राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.  

 

 


 Give Feedback



 जाहिराती