सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • घराचा उंबरठा न ओलांडणारे आता हंबरडा फोडताहेत, एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका
  • केवायसीला गावात नेटवर्क नाही, 'लाडक्या बहिणींना' सातपुड्याचा डोंगर चढून घ्यावा लागतोय सिग्नलचा शोध, झाडांच्या फांद्यांवर फोन अडकवतात
  • कोल्हापुरातील बनावट नोटा तयार करणाऱ्यांची टोळी मिरजेत जेरबंद! कोल्हापूर पोलिस दलातील हवालदार मास्टरमाईंड निघाला
 जिल्हा

अन्नसुरक्षा व मानके कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा– मंत्री नरहरी झिरवाळ

डिजिटल पुणे    13-10-2025 18:27:20

नाशिक :  अन्नाची गुणवत्ता सुनिश्चिती  तसेच अन्नाचे उत्पादन, प्रकिया, वितरण व विक्री यांचे नियमन अन्न व मानके कायद्यान्वये करण्यात येते. शासनस्तरावर या कायद्याच्या प्रभावी अमंलबजावणीसाठी जगजागृतीसह  नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे प्रतिपादन अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केले.अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र व नासिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चअर्स असोसिएशन (निमा) यांच्या संयुक्त विद्यमाने निमा हाऊस येथे आयोजित ‘सण महाराष्ट्राचा, संकल्प अन्न सुरक्षिततेचा’ जनजागृती कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी मंत्री झिरवाळ बोलत होते. यावेळी  निमाचे अध्यक्ष आशिष नहार, अन्न व औषधे प्रशासन सहआयुक्त दिनेश तांबोळी, सहाय्यक आयुक्त मनिष सानप, विनोद धवड, अश्वमेध प्रयोगशाळेच्या डॉ. अपर्णा फरांदे, अन्न सुरक्षा अधिकारी अश्विनी पाटील, निमाचे उपाध्यक्ष मनिष रावल, सचिव राजेंद्र अहिरे, कोषाध्यक्ष राजेंद्र वडनेरे, सहसचिव किरण पाटील, निमाच्या अन्नसुरक्षा समितीचे चेअरमन वैभव नागशेठिया, को-चेअरमन भावेश भन्साळी यांच्यासह उद्योजक, अश्वमेध प्रयोगशाळा व के.के.वाघ महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

मंत्री झिरवाळ म्हणाले की, सणांच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनामार्फत विशेष मोहिम राबविली जात असून यात संशयास्पद माव्यापासून तयार करण्यात येणारी मिठाई व भेसळयुक्त दुग्धजन्य अन्नपदार्थाच्या नमुन्यांची तपासणी सुरू आहे. दुग्धजन्य अन्नपदार्थांसोबतच इतर अन्नपदार्थ खरेदी करतांना नागरिकांनी सजगता बाळगणे महत्त्वाचे आहेत. नागरिकांना बहुतांश अन्न पदार्थ भेसळयुक्त आहेत किंवा कसे? ही तपासणी घरगुती स्तरावर करता येणे प्रत्येकास शक्य आहे. अन्न पदार्थातील भेसळ ओळखणे व अन्न व सुरक्षा मानके कायद्याचे महत्त्वा यांची शहरासह व ग्रामीण भागात प्रबोधनपर कार्यक्रमातून प्रभावी जनजागृती होणे गरजेचे आहे. अन्न पदार्थ तपासणीचे अहवाल वेळेत प्राप्त होण्यासाठी व होणारा विलंब टाळण्यासाठी  विभागस्तरावर सहा व मुंबई शहरात दोन प्रयोगशाळा स्थापित होणार असून यास मान्यता मिळाली आहे. निमातर्फे आयोजित जनजागृती कार्यशाळेचा उपक्रम स्तुत्य असून नाशिकमध्ये अन्न उद्योग उभारणीसाठी सदैव प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्योगास चालना देण्यासाठी नाशिकमध्ये सीपीआरआयच्या प्रादेशिक तपासणी प्रयोगशाळा कार्यान्वित झाली आहे. यासोबतच नाशिकच्या औद्योगिक वसाहतीत अन्न व औषध प्रशासनाचे नवीन कार्यालय सुरू करण्यासह नवनवीन उद्योग नाशिकमध्ये आणण्यास प्रशासनाचे पाठबळ मिळावे अशी अपेक्षा निमाचे अध्यक्ष नहार यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केली.

यावेळी सहआयुक्त तांबोळी यांनी अन्न व औषध प्रशासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सहाय्यक आयुक्त धवड यांनी अन्न सुरक्षा मानके कायदा 2006 चे महत्त्व व त्यातील विविध कलमांची माहिती दिली. डॉ. फरांदे यांनी  आहारातील विविध पोषणद्रव्यांचे महत्त्व त्याअभावी होणारे विकार यांची माहिती दिली.अश्वमेध प्रयोगशाळेतील विद्यार्थ्यांनी अन्नपदार्थातील भेसळ ओळखण्याची प्रात्यक्षिके सादर केली तर के.के. वाघ महाविद्यालयातीन अन्न  तंत्रज्ञान विभागाच्या विद्यार्थांनी प्रबोधनपर पथनाट्य सादर केले.


 Give Feedback



 जाहिराती