पुणे : जुन्या कात्रज घाटात आज (मंगळवार) सकाळी सुमारे ८:४० वाजता भिलारेवाडी वळणाजवळ पीएमटी बस आणि हिरो होंडा पॅशन मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात मोटरसायकलवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. अपघातामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
जुन्या कात्रज घाटात आज (मंगळवार) सकाळी झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात सकाळी सुमारे ८.४० वाजता भिलारेवाडी वळणाजवळ घडला.मिळालेल्या माहितीनुसार, पीएमटी बस (क्र. MH14/HU/6432) आणि हिरो होंडा पॅशन मोटारसायकल (क्र. MH12/FB/0348) यांची समोरासमोर धडक झाली. या धडकेत मोटारसायकलवरील आकाश रामदास गोगावले (वय 29, रा. ससेवाडी, भोर) आणि अनुष्का प्रकाश वाडकर (वय 27) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर नेहा कैलास गोगावले (वय 20) ही गंभीर जखमी असून तिच्यावर भारती हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.
अपघातानंतर पीएमटी बसचालक सुधीर दिलीप कोंडे (वय 42, रा. आर्वी, पुणे) यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.