सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी! कार्यकर्त्यांना संधी; ZP मध्ये 5 अन् पंचायत समितीमध्ये 2 स्वीकृत सदस्य घेणार? मुख्यमंत्र्यांना पत्र
  • बातमी! क्रॉम्रेड पानसरेंच्या हत्याप्रकरणातील सर्वच 12 आरोपींची सुटका; हायकोर्टाकडून तिघांना जामीन
  • : वडिलांचं वय मुलाच्या वयापेक्षा कमी कसं, राज ठाकरेंचे उद्धव ठाकरे, शरद पवारांसमोर निवडणूक आयोगाला धडाधड प्रश्न
  • मतदान कुणाला जातं हेच कळतं नाही; उद्धव ठाकरेंचे निवडणूक आयोगाला रोखठोक सवाल
 जिल्हा

मांजरखेड येथे बांबू परिषद उत्साहात

डिजिटल पुणे    14-10-2025 14:54:17

अमरावती : शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती व पर्यावरण संतुलनासाठी मांजरखेड, ता. धामणगाव येथे बांबू परिषद उत्साहात पार पडली. या परिषदेला राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी मार्गदर्शन केले.या परिषदेला आमदार प्रताप अडसड, सरपंच पल्लवी देशमुख, नंदूभाऊ खेरडे, शैलेश खेरडे, बांबू लागवड तज्ज्ञ संजय चरपे, तालुका कृषी अधिकारी संचित भाकरे, रावसाहेब रोठे, प्रदिप जळीत आदी उपस्थित होते.

पाशा पटेल म्हणाले, बांबू लागवडीकडे पंजाब आणि अमेरीकेसारख्या देशाने दुर्लक्ष केले आहे. बांबूमध्ये कार्बनचे प्रमाण कमी करण्याची क्षमता आहे. बांबूचे विविध उपयोग होत आहे. बांबूपासून कपडे, शाल तसेच लोणचेही बनविता येते. मात्र आपल्याकडे याची माहिती आणि महत्त्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचले नाही. आपल्या क्षेत्रात बांबू नसल्याने त्यावर आधारीत उद्योगही कमी आले आहेत. बांबूची लागवड झाल्यास उद्योग येण्यास मदत होणार आहे. रोजगार हमी योजनेतून बांबूची लागवड केल्यास शेतकऱ्यांना चार वर्षात सात लाख रूपयांचे अनुदान मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी नाल्याकाठी बांबू लागवड करावी. यामुळे जमिनीला पकड राहत असल्याने बांबूचा उपयोग पूर प्रतिबंधक म्हणून होतो. त्यासोबतच वादळाचा सामना करण्यासाठीही बांबू उपयोगी पडत असल्याचे सांगितले.


 Give Feedback



 जाहिराती