सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • राज ठाकरे कडाडले, जयंत पाटलांनी पुरावे दाखवले; उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणूका रद्द करा
  • महाराष्ट्राची नक्षलमुक्तीच्या दिशेनं वाटचाल; सोनू उर्फ भूपतीसह 60 जणांची शरणागती, मुख्यमंत्र्यांनी संविधानाची प्रत दिली
  • लाखाने निवडून येणारे बाळासाहेब थोरात पडले कसे, राज ठाकरेंचा सवाल; म्हणाले, लपवाछपवी बंद करून निवडणूक पुढे ढकला
 शहर

पुण्यात प्रथमच “पुरोहितांचा भव्य मेळावा व पदनियुक्ती कार्यक्रम” उत्साहात पार पडला

गजानन मेनकुदळे    15-10-2025 12:25:21

पुणे :अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, पुणे जिल्हा पुरोहित आघाडी तर्फे “पुरोहितांचा भव्य मेळावा व पदनियुक्ती कार्यक्रम” प्रथमच मोठ्या थाटामाठात पार पडला. या कार्यक्रमाला पुण्यासह इतर जिल्ह्यांतील सुमारे ४०० हून अधिक पुरोहित, कीर्तनकार, प्रवचनकार व आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवरांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

कार्यक्रमाचे आयोजन महालक्ष्मी मंदिर, अभिरुची मॉल शेजारी, सिंहगड रोड, पुणे येथे करण्यात आले होते.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व भगवान परशुराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमापूजनाने झाली.

या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. मोहनजी दाते (सुप्रसिद्ध दाते पंचांगकर्ते), मा. श्री. देगलूरकर सर (ज्येष्ठ मूर्ती अभ्यासक), राष्ट्रीय अध्यक्ष गोविंदजी कुलकर्णी, केतकीजी कुलकर्णी, दत्तसेवक अवधूत गुरुजी विवेक इन्नरकर, प्रदेशाध्यक्ष निखिल लातुरकर, दत्तात्रेय देशपांडे, वृषालीताई शेकदार व संदीपजी खर्डेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सामुदायिक वेदपठणाद्वारे वातावरण मंगलमय झाले. त्यानंतर धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुरुजींचा सन्मान व पदनियुक्तीपत्र वितरण करण्यात आला.या प्रसंगी श्री. उमेश जोशी (गुरुजी) यांची संपर्क प्रमुख, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पुणे जिल्हा पुरोहित आघाडी म्हणून मा. श्री. मोहनजी दाते यांच्या हस्ते नियुक्ती करण्यात आली.तसेच उपस्थितांना २०२६ चे मिनी पॉकेट पंचांग मोहनजी दाते यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रस्ताविक संतोष वैद्य गुरुजींनी, सूत्रसंचालन सुप्रसिद्ध निवेदक प्रमोदजी कुलकर्णी यांनी, तर आभारप्रदर्शन राहूलशास्त्री भाले गुरुजींनी केले.


 News Feedback

Digital Pune
Umesh joshi guruji
 15-10-2025 13:44:18

आपले मनापासून धन्यवाद सर

 Give Feedback



 जाहिराती