पुणे : द फिनिक्स फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने मा. राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधाताई कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त “भव्य रक्तदान शिबिर व आयुष्मान भारत योजना अभियान” आयोजित करण्यात आले आहे.हे शिबिर रविवार, दि. 26 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत सहकार उद्यान, हॉटेल स्वीकार लेन, नळ स्टॉप जवळ, एरंडवणा, पुणे येथे होणार आहे. रक्तदान करणाऱ्या प्रत्येकाला फिनिक्स फाउंडेशनतर्फे आकर्षक भेटवस्तू देण्यात येईल.आयुष्मान भारत योजना अंतर्गत 70 वर्षे व त्यापुढील नागरिकांसाठी मोफत नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे.
“द फिनिक्स फाउंडेशन पुणे” यांच्या वतीने मा. राज्यसभा खासदार प्रा. डॉ. मेधाताई कुलकर्णी यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिर व आयुष्मान भारत योजना अभियान आयोजित करण्यात आले आहे. हा उपक्रम समाजातील आरोग्यजागृती, मानवतेचा संदेश आणि सेवाभाव वाढविण्यासाठी राबविण्यात येत आहे.
दिनांक : 26 ऑक्टोबर 2025, रविवार
वेळ : सकाळी 10.00 ते सायं. 5.00
स्थळ : सहकार उद्यान, हॉटेल स्वीकार लेन, नळ स्टॉप जवळ, एरंडवणा, पुणे
Google Map Link : https://share.google/LqUf5hOxwthBFJw1T
रक्तदान शिबिराची वैशिष्ट्ये :
समाजातील सर्व वयोगटातील नागरिकांसाठी खुले.
प्रशिक्षित वैद्यकीय तज्ञांच्या उपस्थितीत सुरक्षित रक्तदानाची सुविधा.
रक्तदान करणाऱ्या प्रत्येक दात्यास फिनिक्स फाउंडेशनतर्फे आकर्षक भेटवस्तू.
सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र दिले जाईल.
संकलित रक्त पुण्यातील मान्यताप्राप्त रक्तपेढ्यांमार्फत रुग्णांना उपलब्ध करून दिले जाईल.
आयुष्मान भारत योजना अभियान :
या योजनेअंतर्गत 70 वर्षांवरील नागरिकांसाठी मोफत आरोग्य विमा योजना नोंदणी केली जाईल.
नागरिकांना त्यांच्या आरोग्यसंबंधी शंका, हक्क आणि लाभ याबद्दल माहिती दिली जाईल.
नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे :
रेशन कार्ड
आधार कार्ड
पासपोर्ट साईज फोटो
योजनेच्या अंतर्गत पाच लाख रुपयांपर्यंतचा वार्षिक आरोग्य विमा लाभ मिळतो.
नोंदणी प्रक्रिया :
रक्तदान किंवा आयुष्मान कार्डसाठी नोंदणी करू इच्छिणाऱ्या नागरिकांनी खालीलप्रमाणे माहिती व्हॉट्सअपवर पाठवावी :
नाव
पत्ता
"रक्तदान" / "आयुष्मान कार्ड" असा उल्लेख
व्हॉट्सअप क्रमांक :
8805601068
8459543944
आयोजक व मार्गदर्शक :
सौ. यामिनी अमोल मठकरी
संस्थापक व अध्यक्ष, द फिनिक्स फाउंडेशन पुणे
संस्थेचा उद्देश :
“द फिनिक्स फाउंडेशन पुणे” ही संस्था सामाजिक, आरोग्य, शिक्षण आणि पर्यावरण संवर्धन क्षेत्रात कार्यरत आहे. समाजातील प्रत्येक घटकाला सहकार्य देत आरोग्यदायी आणि सशक्त समाज उभारण्याचा संस्थेचा ध्यास आहे.
आवाहन :
फिनिक्स फाउंडेशनच्या या समाजोपयोगी उपक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करून जीवनदान द्यावे आणि आयुष्मान भारत योजना अंतर्गत नोंदणी करून आपल्या आरोग्यसुरक्षेची हमी घ्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.