सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • कोल्हापुरात सहा नृत्यांगनांकडून हाताच्या नसा कापत थेट महिला सुधारगृहात सामूहिक आयुष्य संपवण्याचा प्रयत्न
  • 'आम्ही पराकाष्ठा करू, आरक्षणाला धक्का लागणार नाही'
  • मी 18 पैकी 16 निवडणुका जिंकल्या; मागच्या दाराने कधीच गेलो नाही, माझे वडील काही मंत्री नव्हते, ना खासदार होते, चिखलीकरांची अशोक चव्हाणांवर टीका
  • मोठी बातमी: भाजप आमदार शिवाजीराव कर्डिले यांचे निधन, वयाच्या 67 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
  • राज्य सरकारची शेतकऱ्यांना सढळ हाताने मदत करण्याची तयार नसल्याने काळी दिवाळी साजरी करावी लागतेय: शरद पवार
 जिल्हा

आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर व सिने अभिनेते जॅकी श्रॉफ यांची सदिच्छा भेट;‘थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र’ अंतर्गत श्रॉफ सहकार्य करणार

डिजिटल पुणे    17-10-2025 16:52:11

मुंबई/कोल्हापूर: हिंदी सिनेसृष्टीतील नामवंत कलाकार जॅकी श्रॉफ यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची सदिच्छा भेट घेतली. थॅलेसिमिया या रक्ताच्या अनुवंशिक गंभीर आजाराविषयी श्रॉफ हे संवेदनशील असून त्याबाबत समाजामध्ये प्रबोधन करण्याच्या कामात शासनास सहकार्य करण्याची इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.अभिनेते श्रॉफ मागील काही वर्षांपासून विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून थॅलेसेमिया विषयावर सातत्याने काम करत आहेत. या आजारावर मात करण्यासाठी समाजातील सर्व घटक, सेवाभावी संस्था, संघटना, प्रतिष्ठित नागरिक व डॉक्टर्सनी एकत्र येऊन काम करण्याची गरज असल्याचे आवाहन आरोग्यमंत्री आबिटकर यांनी यावेळी केले.

महाराष्ट्र शासनाच्या ‘थॅलेसिमिया मुक्त महाराष्ट्र’ या अभियानासाठी सदिच्छादूत म्हणून अभिनेते श्रॉफ यांनी शासनास सहकार्य करण्याबाबत यावेळी अनौपचारिक चर्चा झाली. या आजाराविषयी अधिक चांगली जनजागृती आणि या उपक्रमाला लोकचळवळीचे स्वरूप यावे, असे आवाहन आरोग्यमंत्र्यांनी यावेळी केले.या भेटीवेळी आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी राज्य रक्त संक्रमण परिषदेचे डॉ. पुरुषोत्तम पुरी, मंगेश चिवटे, गजेन्द्रराज पुरोहित आदी मान्यवर उपस्थित होते


 Give Feedback



 जाहिराती