सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • वाल्मीक कराड नसल्याची खंत वाटत असेल तर त्याच्यासोबत जाऊन बसा, प्रकाश सोळंकेंचा धनंजय मुंडेंना टोला
  • जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
  • माझ्या मुलीची हत्या केली, नंतर आत्महत्या दाखवली; गौरी पालवेच्या वडिलांचा आरोप, पंकजा मुंडेंच्या पीएच्या अडचणी वाढल्या
  • पोर्टेबल सोनोग्राफी यंत्राने कारमध्येच गर्भलिंग निदान केलं, नाशिकमध्ये बड्या डॉक्टरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, वैद्यकीय क्षेत्रात खळबळ
  • धक्कादायक! निवडणुकीसाठी 10 लाख घेऊन ये म्हणत विवाहितेचा छळ, महिलेचं टोकाचं पाऊल; कोल्हापुरात खळबळ
 DIGITAL PUNE NEWS

धनत्रयोदशी महत्व धनत्रयोदशी कथा व सांस्कृतिक महत्व! समृद्धी, आरोग्य आणि सौख्याचा मंगल सण!”

डिजिटल पुणे    18-10-2025 10:55:46

धनत्रयोदशी महत्व

धनत्रयोदशी : कथा व सांस्कृतिक महत्व! 

धनत्रयोदशी : धनत्रयोदशी, हा दिवाळी हा सण संपन्नतेचा सण आहे. धनत्रयोदशी ला धन म्हणजेच पैसा, सोने-चांदी यांची पूजा करून आपली व आपल्या कुटुंबाची उत्तरोत्तर प्रगती होत राहावी अशी प्रार्थना केली जाते.

धनत्रयोदशीचे अध्यात्मिक महत्व - धनतेरस किंवा धनत्रयोदशी ही अश्विन कृष्ण त्रयोदशीस धनत्रयोदशी हा सण साजरा केला जातो. हा दिवस दिवाळी सणाचा पहिला दिवस म्हणून ओळखला जातो. दिवाळीची सुरवात या दिवसापासून होते.

धनत्रयोदशी या सणामागे एक मनोवेधक कथा आहे

कथित भविष्यवाणी प्रमाणे हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो. आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न लावून देतात. लग्नानंतरचा चवथा दिवस हा तो मृत्युमुखी पडण्याचा दिवस असतो. या रात्री त्याची पत्नी त्याला झोपू देत नाही. त्याच्या अवतीभवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात. महालाचे प्रवेशद्वार ही असेच सोन्या-चांदीने भरून रोखले जाते. सर्व महालात मोठमोठ्या दिव्यांनी लखलखीत प्रकाश केला जातो. वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून पत्नी त्याला जागे ठेवते. जेव्हा यम राजकुमाराच्या खोलीत सर्परुपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेंव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपतात. या कारणास्तव यम आपल्या यमलोकात परततो. अश्या प्रकारे राजकुमाराचे प्राण वाचते. म्हणूनच या दिवसास यमदीपदान असेही म्हणतात.या दिवशी सायंकाळी घराबाहेर दिवा लावून त्याच्या वातीचे टोक दक्षिण दिशेस करतात. त्यानंतर त्या दिव्यास नमस्कार करतात. याने अपमृत्यु टळतो.

काय आहे धनत्रयोदशीचं महत्व?

दिवाळी आनंदाचा आणि उत्साहाचा सण. या सणात धनत्रयोदशीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्याकडे असलेली संपत्ती, धन यांच्याबद्धल आपल्या मनात असलेले प्रेम, कृतज्ञता व्यक्त करण्याच्या भावनेतून धनत्रयोदशीचा दिवस साजरा केला जातो.

व्यापारी आणि शेतकरी वर्गात हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी सर्वत्र मिठाई आणि गोडधोड पदार्थांचे वाटप केले जाते. नोकरी, व्यवसाय यानिमीत्त परगावी असलेली कुटूंबातील मंडळी एकत्र येतात. आनंदाने दिवळी साजरी करतात.

धनत्रयोदशी म्हणजे काय ?

आश्विन वद्य त्रयोदशीला धनत्रयोदशी असे म्हटले जाते. धनाची पूजा करण्यासाठी हा दिवस खास मानला जातो. आजच्या दिवशी शेतकरी व कारागीर लोक आपल्या व्यवसायाशी संबंधीत अवजारांची पूजा करतात. शेतकरी नांगर, तिफन, कुळव यांसारख्या शेतीशी संबंधीत सर्व अवजारांची पूजा करतात. तर व्यापारी  दिवशी पाटावर लक्ष्मीची मुर्ती ठेवून तीची पूजा करतात. हिशोबाच्या वह्या, सोने-नाणे तसेच लिखापडीसाठी आणलेल्या वह्यांचीही या दिवशी पूजा केली जाते.

शेतऱ्यांसाठी शेतातून आलेले नवे धान्य हेच त्याचे खरे धन असते. हीच त्याची संपत्ती असते. त्यामुळे तो धान्याची पूजा करतो. त्यासाठी धने, गुळ, खोबरे व पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. तसेच झेंडू, शेवंती यांच्या फूलांचा हार, फुले देवाला वाहतात. आजच्या दिवशी अंगणभर पणत्या लावल्या जातात. घरांना विद्यूत रोषनाई केली जातो. घरे, गाव, शहरे व सारा आसमंत पणत्या आणि विद्यूत रोषनाईने उजळून निघतो. व्यापाली व शेतकरी वर्गात आजचा दिवस मोठ्या आनंदाने साजरा करतात.  वैद्य लोक ह्या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात.

संग्रहक- वे. श्री ईश्वर स्वामी होळीमठ (ज्योतिष शास्त्री ) सोलापूर.


 Give Feedback



 जाहिराती