सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • भयंकर! गतिमंद मुलांना कुकरच्या झाकणांसह लाथा बुक्क्यांनी मारहाण, शिपाई अन् केअरटेकरच्या राक्षसी वर्तनाचा संतापजनक प्रकार
  • मोठी बातमी: अ‍ॅडव्होकेट असीम सरोदेंची सनद रद्द , बार कौन्सिलचा मोठा निर्णय
  • : भाजपकडून राज ठाकरेंवर प्रहार; उद्धव ठाकरे बंधूंसाठी छातीचा कोट करुन उभे राहिले, धडाधड प्रत्युत्तर दिले,
  • पराभूत होताच दक्षिण अफ्रिकेचे खेळाडू ढसाढसा रडू लागले; टीम इंडियाचे खेळाडू धावले, वर्ल्डकपच नव्हे मनंही जिंकले
  • वर्ल्डकपची मोहीम फत्ते, आता लगीनघाई; स्मृती मानधनावर होणाऱ्या नवऱ्याकडून कौतुकाची उधळण
  • पुणे पोलिसांच्या नाकावर टिच्चून गणेशला संपवलं; आंदेकर Vs कोमकर गँगवॉर पुन्हा भडकलं, मिसरुडही न फुटलेल्या लहान मुलांचा वापर
 विश्लेषण

मोठी बातमी! मुंबईत 20 हून अधिक मुलांना ओलीस ठेवलं; आरोपी रोहित आर्य ताब्यात, सर्व मुलांची सुखरूप सुटका

डिजिटल पुणे    30-10-2025 17:26:55

मुंबई : राजधानी मुंबईतील पवईत एका व्यक्तीने अनेक मुलांना ओलीस ठेवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ओलीस ठेवण्यात आलेली सर्व मुले 15 वर्षांखालील असून 20 ते 22 मुला-मुलींना एका खोलीत बंद करुन ठेवण्यात आले होते. गेल्या पाच दिवसांपासून या भागात शूटिंग ऑडिशन चालू असल्याने ही मुले येथे येत आहेत. मात्र, आज सर्व मुलांना ओलीस ठेवून संबंधित आरोपी किडनॅपरने व्हिडिओद्वारे माहिती दिली. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि NSG कमांडो पोहोचले. त्यानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांच्या मदतीने अखेर ओलीस ठेवणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेत मुलांची सुटका करण्यात आली.

आज दुपारी अचानक आरोपीने मुलांना खोलीत कोंडून ठेवले आणि व्हिडिओद्वारे आपली मागणी जाहीर केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस, NSG कमांडो आणि अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी शिताफीने आत प्रवेश करून सर्व मुलांची सुखरूप सुटका केली.

आरोपी रोहित आर्यने व्हिडिओमध्ये म्हटलं की, आत्महत्या करण्याऐवजीमी एक प्लॅन बनवला होता. माझ्या काही मोठ्या मागण्या नाहीत. माझ्या छोट्या मागण्या आहेत. माझे काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची मला उत्तरे हवी आहे. यापलीकड़े मला काहीच नको आहे. मी दहशतवादी नाही. माझी कोणत्याही प्रकारे पैशांची मागणी नाही. मला संवाद साधायचा आहे. ज्यामुळं मी या मुलांना ओलीस ठेवलं आहे. “मी दहशतवादी नाही, पण माझ्या काही साध्या मागण्या आहेत. माझ्याकडे कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे, त्यासाठी मी हा मार्ग निवडला.” आर्यने शिक्षण विभागासाठी “स्वच्छता मॉनिटर” प्रकल्प केला होता, पण त्याचे पैसे सरकारकडून मिळाले नाहीत असा त्याचा दावा आहे.

पोलिसांनी केलेल्या तपासानुसार, ऑडिशनच्या बहाण्याने मुलांना स्टुडिओत बोलावण्यात आलं आणि त्यानंतर त्यांना ओलीस ठेवलं गेलं. रोहितकडे एक बंदूक होती, मात्र ती खरी की बनावट याचा तपास सुरू आहे.पवईच्या रा स्टुडीओमध्ये मुलांना ओलिस ठेवण्यात आलं आहे. मुलांना ताब्यात घेणाऱ्या व्यक्तीला पोलीस आणि अग्निशामक दलाच्या मदतीने ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. डांबून ठेवलेल्या मुलांची सुखरुप सुटका देखील करण्यात आली आहे.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, सकाळी 25-30 मुलं शूटिंगसाठी आली होती. दुपारी बंदुकीच्या धाकाने त्यांना बंद केलं गेलं. पवई पोलिसांनी आणि डीसीपींच्या टीमने वेळेवर कारवाई करत सर्वांना वाचवलं.सुदैवाने सर्व मुले सुखरूप आहेत, परंतु घटनेनंतर त्यांच्यात भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून आरोपी माथेफिरू रोहित आर्यला ताब्यात घेण्यात आलं असून त्याची चौकशी सूरू आहे. मात्र, या घटनेनं राजधानी मुंबईत चांगलीच खळबळ उडाली होती. सुदैवाने सर्व मुले सुखरुप आहेत, पण ते घाबरलेले आहेत असे पालकांकडून सांगण्यात येत आहे.  आरोपीला पोलिसांनी अटक करून पुढील चौकशी सुरू केली आहे.


 Give Feedback



 जाहिराती