सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • भयंकर! गतिमंद मुलांना कुकरच्या झाकणांसह लाथा बुक्क्यांनी मारहाण, शिपाई अन् केअरटेकरच्या राक्षसी वर्तनाचा संतापजनक प्रकार
  • मोठी बातमी: अ‍ॅडव्होकेट असीम सरोदेंची सनद रद्द , बार कौन्सिलचा मोठा निर्णय
  • : भाजपकडून राज ठाकरेंवर प्रहार; उद्धव ठाकरे बंधूंसाठी छातीचा कोट करुन उभे राहिले, धडाधड प्रत्युत्तर दिले,
  • पराभूत होताच दक्षिण अफ्रिकेचे खेळाडू ढसाढसा रडू लागले; टीम इंडियाचे खेळाडू धावले, वर्ल्डकपच नव्हे मनंही जिंकले
  • वर्ल्डकपची मोहीम फत्ते, आता लगीनघाई; स्मृती मानधनावर होणाऱ्या नवऱ्याकडून कौतुकाची उधळण
  • पुणे पोलिसांच्या नाकावर टिच्चून गणेशला संपवलं; आंदेकर Vs कोमकर गँगवॉर पुन्हा भडकलं, मिसरुडही न फुटलेल्या लहान मुलांचा वापर
 विश्लेषण

मोठी बातमी :पवईत थरार! 20 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा पोलिसांकडून एन्काउंटर

डिजिटल पुणे    30-10-2025 18:13:47

मुंबई : मुंबई पवईतील एका स्टुडिओमध्ये 20 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा पोलिसांनी एन्काउंटर केला. पोलिसांच्या गोळीबारात छातीत डाव्या बाजुला गोळी लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनास्थळी पोलिसांनी त्वरित कारवाई केली आणि मुलांना सुरक्षित बाहेर काढले. पोलिसांनी या प्रकरणी सुरक्षा कारणास्तव तपास सुरू केला असून, मुलांवर झालेला ताण आणि आरोपीची भूमिका स्पष्ट करण्यात येत आहे.. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सर्व मुलांना सुखरूप वाचवले असून, या घटनेमुळे मुंबईसह राज्यभरात खळबळ उडाली आहे.

राजधानी मुंबईतील पवईत एका व्यक्तीने अनेक मुलांना ओलीस ठेवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ओलीस ठेवण्यात आलेली सर्व मुले 15 वर्षांखालील असून 17 मुला-मुलींना एका खोलीत बंद करुन ठेवण्यात आले होते. या मुलांसह 2 पालकही खोलीत बंद होते. याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस आणि NSG कमांडो पोहोचले. त्यानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांच्या मदतीने अखेर ओलीस ठेवणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेत मुलांची सुटका करण्यात आली. यावेळी, आरोपी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली असून पोलिसांच्या चकमकीत आरोपी रोहित आर्यचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. 

मुंबईच्या पवई परिसरातील RA स्टुडिओ येथे काही शाळकरी मुलं ऑडिशनसाठी आली होती. या स्टुडिओमध्ये आरोपी रोहित आर्यने सर्व मुलांना एका खोलीत बंद करून ओलीस ठेवले. ओलीस ठेवलेली सर्व मुले 15 वर्षांखालील असून, त्यांच्यासोबत दोन पालकही आतमध्ये होते. घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि NSG कमांडो घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दल आणि पोलिसांच्या मदतीने सर्व मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली.

आरोपीचा हेतू :

रोहित आर्यने एका व्हिडिओद्वारे सांगितले की,रोहित आर्य असं मुलांना ओलीस ठेवलेल्या आरोपीचं नाव असून माझ्या काही मागण्या आहेत. मी आत्महत्या करण्याऐवजी या मुलांना बंदी बनवलं आहे, असं रोहित आर्यने व्हिडिओच्या माध्यमातून म्हटलं आहे. मी दहशतवादी नाही, माझ्या काही साध्या मागण्या आहेत. मला संवाद साधायचा आहे, काही बोलायचं आहे, मला काही लोकांशी बोलायचं आहे, त्यांना प्रश्न विचारायचे आहेत असं रोहित आर्यने म्हटलं आहे.  

मी दहशतवादी नाही. माझी पैशाची मागणी केलेली नाही. अनेक प्रयत्न झाले. अनेकांना अनेकवेळा भेटून झाले. 1 मे पासून साधे उपोषण करून देखील अजून आज/उद्या असेच होत आहे. त्यामुळे, आजपासून मी तीव्र उपोषण सुरु केले. आता, पाणी सुद्धा घेणार नाही. गांभीर्य समजून घेतले तर बरे होईल, नाही समजले तर जय श्री राम असं  रोहित आर्यने म्हटलं. मी एकटा नाही, अनेक लोकांना हा प्रश्न आहे, त्याच सोल्युशनसाठी मला संवाद साधायचा आहे, असंही ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यने म्हटलं. दरम्यान, एका प्रकल्पात आर्थिक नुकसान झाल्यामुळे रोहितने संबंधित विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी हे कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. आर्य हा मागील काही दिवसांपूर्वी उपोषणाला बसला होता, त्याचे पैसे सरकारकडे आहेत. शिक्षण विभागासाठी त्याने स्वच्छता मॉनिटरचा एक प्रोजेक्ट लोन काढून केला होता, त्याचे पैसे त्याला मिळाले नाहीत आणि कोटी रुपयांचं नुकसान झाल्याचं त्याचं म्हणणं आहे.  “मी दहशतवादी नाही, माझ्या काही साध्या मागण्या आहेत. मी आत्महत्या करण्याऐवजी ही कृती केली आहे. माझा सरकारकडे आर्थिक तोटा भरून मिळावा अशी मागणी आहे.”माहितीनुसार, रोहितने शिक्षण विभागासाठी ‘स्वच्छता मॉनिटर’ प्रकल्प उभारला होता. परंतु त्याचे पैसे थकले असल्याने त्याला कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. मागील काही दिवसांपासून तो उपोषणावरही बसला होता.

पोलिसांची धाडसी कारवाई :

दुपारी पावणे दोनच्या सुमारास पोलिसांना कॉल आला की, महावीर क्लासिक इमारतीत एका व्यक्तीने मुलांना ओलीस ठेवले आहे. पवई पोलिसांनी तात्काळ स्पेशल युनिट्स आणि क्विक अॅक्शन फोर्सला बोलावले. पोलिस अधिकाऱ्यांनी बाथरुममधून आत प्रवेश करत मुलांची सुटका केली. एकूण 17 मुलं, एक वयस्कर महिला आणि एक स्थानिक व्यक्ती अशी 19 लोकांची यशस्वी सुटका करण्यात आली.

पवई स्टुडिओमध्ये 17 मुलांना किडनॅप प्रकरणात दोन जण जखमी झाल्याची माहिती आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांकडून करण्यात आलेल्या रेस्क्यू ऑपरेशन दरम्यान एक सिनिअर सिटीझन महिला आणि लहान मुलगी जखमी झाली आहे. जखमीना जवळच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे. पोलीस हवालदार शिवाजी सावंत यांनी महिलेला सुखरूप वाचवल्याची माहिती संबंधित महिलेकडून देण्यात आली.

पवई स्टुडिओ ऑडिशन किडनॅपिंग केस प्रकरणातील आरोपी रोहित आर्या याने पोलिसांवर गोळीबार केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यानंतर पोलिसांनी क्रॉस गोळीबार करत एक राउंडही फायर केला होता. या गोळीबारात आरोपी रोहित आर्या जखमी झाला, उपचारादरम्यान आरोपी रोहित आर्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे.

मुलांची सुटका करताना आरोपीने पोलिसांवर गोळीबार केला. प्रत्युत्तरात पोलिसांनीही गोळीबार करत एक राउंड फायर केला. या चकमकीत रोहित आर्य जखमी झाला आणि उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.या ऑपरेशनदरम्यान एका सिनिअर सिटीझन महिलेला आणि एका लहान मुलीला किरकोळ दुखापत झाली असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी पोलिसांचे कौतुक करत म्हटले की,“मुंबई पोलिसांनी तात्काळ कारवाई करून मोठा अनर्थ टाळला. सोसायटींनी हॉल देताना नोंद ठेवावी आणि पालकांनी भ्रमित करणाऱ्या जाहिरातींना बळी पडू नये.”


 Give Feedback



 जाहिराती