सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • भयंकर! गतिमंद मुलांना कुकरच्या झाकणांसह लाथा बुक्क्यांनी मारहाण, शिपाई अन् केअरटेकरच्या राक्षसी वर्तनाचा संतापजनक प्रकार
  • मोठी बातमी: अ‍ॅडव्होकेट असीम सरोदेंची सनद रद्द , बार कौन्सिलचा मोठा निर्णय
  • : भाजपकडून राज ठाकरेंवर प्रहार; उद्धव ठाकरे बंधूंसाठी छातीचा कोट करुन उभे राहिले, धडाधड प्रत्युत्तर दिले,
  • पराभूत होताच दक्षिण अफ्रिकेचे खेळाडू ढसाढसा रडू लागले; टीम इंडियाचे खेळाडू धावले, वर्ल्डकपच नव्हे मनंही जिंकले
  • वर्ल्डकपची मोहीम फत्ते, आता लगीनघाई; स्मृती मानधनावर होणाऱ्या नवऱ्याकडून कौतुकाची उधळण
  • पुणे पोलिसांच्या नाकावर टिच्चून गणेशला संपवलं; आंदेकर Vs कोमकर गँगवॉर पुन्हा भडकलं, मिसरुडही न फुटलेल्या लहान मुलांचा वापर
 DIGITAL PUNE NEWS

क्रीडा शौर्याबद्दल रौप्यकन्या शौर्याचे क्रीडामंत्र्यांकडून कौतुक; आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत हर्डल्स शर्यतीत रौप्यपदक

डिजिटल पुणे    31-10-2025 14:34:33

मुंबई :  बहारीन येथे नुकत्याच पार पडलेल्या तिसऱ्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत ठाणे जिल्ह्याची  शौर्या अंबुरे हिने उल्लेखनीय कामगिरी करत देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. तिने 100 मीटर हर्डल्स शर्यतीत 13.73 सेकंदांची वेळ नोंदवत रौप्यपदक पटकावले.क्रीडा मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी शौर्या अंबुरे हिच्या या यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन केले असून पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. अंबुरे कुटुंबियांशी संवाद साधत त्यांचेही अभिनंदन केले.ठाण्याची शौर्या अंबुरे हिने महाराष्ट्राचा क्रीडागौरव वाढविला आहे. मुंबई विमानतळावर आगमनानंतर क्रीडा मंत्री ॲड.कोकाटे यांच्या निर्देशानुसार क्रीडा विभागाच्यावतीने तिचे उत्साहात स्वागत करण्यात आले.


 Give Feedback



 जाहिराती