सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • शेवटच्या क्षणी मुंबई काँग्रेसची मोर्चात एन्ट्री; होय नाही करत भाई जगताप व्होट चोर, गद्दी छोड घोषणा देत मोर्चात अवतरले!
  • राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवारांसह काँग्रेसचे प्रमुख नेते सत्याच्या मोर्चात सहभागी; सभास्थळी हजारोंची गर्दी
  • मोठी बातमी! महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेखला अटक; अवैध शस्त्र तस्करीप्रकरणात कारवाई
  • हमाली करून कमावलंय, हरामाचा पैसा शिवणार नाही, हिंद केसरी खेळू नये म्हणून डाव, सिकंदरच्या वडिलांचा खळबळजनक आरोप
  • मतचोरीविरोधात महाविकास आघाडी एल्गार! राज ठाकरे मोर्चासाठी लोकलने दाखल
  • राज ठाकरे-उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीचा आज मुंबईत मोर्चा
  • मुंबईत जय्यत तयारी झाली, पण ‘सत्याच्या मोर्चाला’ अद्यापही परवानगी मिळेना; विनापरवाना मोर्चा काढल्यास कारवाईचा इशारा
 जिल्हा

दिव्यांगांसाठी ४ टक्के आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी होणार – सचिव तुकाराम मुंढे

डिजिटल पुणे    01-11-2025 14:24:57

मुंबई : दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम, २०१६ आणि त्याअंतर्गत नियम २०१७ नुसार राज्यातील सर्व शासकीय, निमशासकीय आस्थापनांना त्यांच्या कार्यालयातील दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती विहित नमुन्यात नोंदविणे आवश्यक आहे. राज्य शासनातील सर्व मंत्रालयीन विभाग, त्यांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील कार्यालये, विभाग प्रमुख तसेच स्वायत्त संस्थांनी आपल्या विभागातील दिव्यांग अधिकारी व कर्मचाऱ्यांची माहिती दरवर्षी १ जानेवारी रोजी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे दिव्यांग व्यक्तींना शासन सेवेत व पदोन्नतीमध्ये असलेल्या ४ टक्के आरक्षणाची प्रभावी अंमलबजावणी होणार असल्याचे दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

सचिव मुंढे म्हणाले, या निर्णयाचा उद्देश शासन सेवेमध्ये कार्यरत असलेल्या दिव्यांग कर्मचाऱ्यांची पारदर्शक व अचूक नोंद ठेवणे आणि दिव्यांगांसाठी असलेल्या ४ टक्के आरक्षणाची अंमलबजावणी प्रभावीपणे राबविणे हा आहे. या निर्णयामुळे राज्य शासनातील विविध विभागांमधील दिव्यांग कर्मचाऱ्यांची माहिती एकाच स्वरूपात उपलब्ध होणार असून, दिव्यांगांच्या हक्कांचे रक्षण आणि सक्षमीकरणाच्या प्रयत्नांना अधिक गती मिळणार आहे.

या निर्णयानुसार सर्व प्रशासकीय विभाग व सर्व विभाग प्रमुख दिव्यांगांसाठी असलेल्या रिक्त पदांचा सहामाही आढावा घेतील. त्यामुळे अनुशेष पदे तत्काळ भरली जातील. सर्व मंत्रालयीन विभाग प्रमुखांनी तयार केलेली माहिती दरवर्षी १ जानेवारी रोजी सर्व विभाग आयुक्त, दिव्यांग कल्याण यांना सादर करतील आणि आयुक्त, दिव्यांग कल्याण हे सर्व विभागांकडील माहिती एकत्र करून वार्षिक अहवालात विभागनिहाय समाविष्ट करतील. जो विभाग निर्धारित नमुन्यानुसार माहिती सादर करणार नाही त्या विभागांविरुद्ध कलम ८९ नुसार दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याचे सचिव श्री. मुंढे यांनी सांगितले.याबाबतचा शासन निर्णय दिव्यांग कल्याण विभागाने निर्गमित केला असून महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


 Give Feedback



 जाहिराती