सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • भयंकर! गतिमंद मुलांना कुकरच्या झाकणांसह लाथा बुक्क्यांनी मारहाण, शिपाई अन् केअरटेकरच्या राक्षसी वर्तनाचा संतापजनक प्रकार
  • मोठी बातमी: अ‍ॅडव्होकेट असीम सरोदेंची सनद रद्द , बार कौन्सिलचा मोठा निर्णय
  • : भाजपकडून राज ठाकरेंवर प्रहार; उद्धव ठाकरे बंधूंसाठी छातीचा कोट करुन उभे राहिले, धडाधड प्रत्युत्तर दिले,
  • पराभूत होताच दक्षिण अफ्रिकेचे खेळाडू ढसाढसा रडू लागले; टीम इंडियाचे खेळाडू धावले, वर्ल्डकपच नव्हे मनंही जिंकले
  • वर्ल्डकपची मोहीम फत्ते, आता लगीनघाई; स्मृती मानधनावर होणाऱ्या नवऱ्याकडून कौतुकाची उधळण
  • पुणे पोलिसांच्या नाकावर टिच्चून गणेशला संपवलं; आंदेकर Vs कोमकर गँगवॉर पुन्हा भडकलं, मिसरुडही न फुटलेल्या लहान मुलांचा वापर
 जिल्हा

उरण व मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या वतीने “राष्ट्रीय एकता दिवस”उत्साहात साजरा

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी )    03-11-2025 10:21:23

उरण : ब्रिटीश राजवटीतून मुक्त झाल्यानंतर, ३ वर्षापूर्वी   देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आपण सर्वांनी साजरा केला.आज देशाच्या स्वतंत्र्याला ७८ वर्षे पूर्ण होत असतानात स्वातंत्र्यपूर्व  परिस्थितीनुसार भारतदेश  अनेक लहान-मोठ्या ५६० हून अधिक संस्थानांमध्ये विखुरलेला होता.

या संस्थानांना भारतीय संघराज्यात विलीन करण्याचे अत्यंत गुंतागुंतीचे कार्य भारत देशाचे पहिले उपपंतप्रधान तथा गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी हे शिवधनुष्य पेलून, भारतांतील अनेक लहान-मोठ्या ५६० हून अधिक संस्थानांमध्ये विखुरलेल्या या संस्थानांना भारतीय संघराज्यात विलीन करण्याचे अत्यंत गुंतागुंतीचे महानकार्य त्यांनी केले म्हणूनच आज आपण सारे भारतीय एकसंघ एकदिलाने स्वतंत्र भारत देशाचे नागरिक म्हणून स्वाभीमाने जगत आहोत. त्यामुळे प्रत्येक भारतीय साठी ३१ ऑक्टोबर हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे कारण हा दिवस म्हणजे स्वतंत्र भारताचे शिल्पकार,देशाचे पहिले उपपंतप्रधान तथा गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे.त्यामुळे संपूर्ण देशभरात हा दिवस संपूर्ण देशात 'राष्ट्रीय एकता दिवस' म्हणून साजरा केला जातो.

एकता आणि अखंडता हे कोणत्याही राष्ट्राच्या अस्तित्वाचा आणि प्रगतीचा आधारस्तंभ आहे.हा संदेश या दिनाच्या माध्यमातून आपल्याला मिळतो.आज संपूर्ण देशभरात हा दिवस साजरा होत असताना उरण तालुकाही त्याला अपवाद नसून उरण आणि मोरा सागरी पोलीस ठाण्याच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीचे औचित्य साधून उरण शहरांतून “एकता दौड रॅलीचे” आयोजन करण्यात आले होते. 

एकता दौड पेन्शन पार्क, उरण या ठिकाणाहून सकाळी ७:३०वाजता सुरू होऊन पुढे स्वामी विवेकानंद चौक, गांधी पुतळ्या समोरून गणपती चौक, राजपाल नाका मार्गाने पालवी हॉस्पिटल समोरून कामठा मार्गे एन आय हायस्कूल- पुन्हा स्वामी विवेकानंद चौक मार्गाने पेन्शन पार्क, उरण  या ठिकाणी ८:१५ वाजता संपन्न झाली. या एकता दौड करिता उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनीफ मुलाणी पो.नि संजय जोशी, ०५ स.पो.नि/पो.उपनि, ४५ अंमलदार तसेच मोरा सागरी पोलीस ठाण्याचे ०२ स.पो.नि/पो. उपनि, २० अंमलदार व २०० ते २५० प्रतिष्ठित नागरिक, माजी नगरसेवक, पोलीस पाटील, सागर रक्षक दल सदस्य, विद्यार्थी  यांनी सहभाग घेतला होता.           

प्रत्येक भारतीयासाठी ३१ ऑक्टोबर हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण हा दिवस म्हणजे स्वतंत्र भारताचे शिल्पकार, पहिले उपपंतप्रधान तथा गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे. त्यांच्या  योगदानाचा सन्मान म्हणून, हा दिवस संपूर्ण देशात 'राष्ट्रीय एकता दिवस' म्हणून साजरा केला जातो. एकता आणि अखंडता हे कोणत्याही राष्ट्राच्या अस्तित्वाचे आणि प्रगतीचे आधारस्तंभ आहेत त्यांच्या स्मृतिदिनी, आपण सर्व भारतीयांनी, त्यांनी पाहिलेल्या अखंड आणि मजबूत भारताचे स्वप्न साकार करण्याची प्रतिज्ञा करावी. देशाची एकता आणि अखंडता जपण्यासाठी सदैव तत्पर राहणे, हीच 'लोहपुरुष' सरदार वल्लभभाई पटेल यांना खरी आदरांजली ठरेल.   

- हनिफ मुलाणी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, उरण पोलीस ठाणे.


 Give Feedback



 जाहिराती