पुणे : दिनांक 1 नोव्हेंबर रोजी बाल गंधर्व रंग मंदिर पुणे येथे अभिनय सम्राट श्री सयाजी शिंदे यांचा त्यांच्या रंगभूमी व चित्रपट क्षेत्रातील प्रदीर्घ अभिनय सेवेबद्दल व सामाजिक सेवा कार्याबद्दल शांतीदूत परिवारातर्फे डॉ. विठ्ठल जाधव IPS, विशेष पोलिस महानिरीक्षक महाराष्ट्र राज्य ( से. नि) मार्गदर्शक शांतीदूत परिवार यांच्या हस्ते शांतीदूत सेवा रत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. शांतीदूत परिवार सेवा कार्याची माहिती देऊन सौ. विद्या ताई जाधव संस्थापक अध्यक्षा शांतीदूत परिवार यांचे हस्ते शांतीदूत परिवार स्मरणिका देण्यात आली व कला क्रीडा साहित्य शांतीदूत परिवारातर्फे योगेश जाधव व अनिता राठोड यांचे हस्ते भेट वस्तू देऊन सन्मानित करण्यात आले.

तसेच श्री सयाजी शिंदे यांचे स्वीय सहाय्यक श्री आदित्य गायकवाड यांचा सत्कार शेतकरी शांतीदूत परिवारातर्फे विजय ठुबे यांनी केला. तसेच शांतीदूत परिवारातर्फे पदाधिकारी श्री सुरेश सकपाळ, डॉ. प्रीती काळे, सौ. व श्री सदानंद बेलसरे पोलिस उपअधीक्षक से. नि., सौ. व श्री विजय वडदरे. न्यूज अन कट चे सौ.व श्री निखिल जाधव पोलिस मित्र शांतीदूत परिवार अध्यक्ष अकबर मेनन, मधू चौधरी, अध्यक्ष शांतीदूत परिवार शिवाजीनगर, नितीन दुधाटे आदी पदाधिकारी यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला . पुनश्च एकदा शांतीदूत परिवारातर्फे श्री सयाजी शिंदे यांचे हार्दिक अभिनंदन

