सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • भयंकर! गतिमंद मुलांना कुकरच्या झाकणांसह लाथा बुक्क्यांनी मारहाण, शिपाई अन् केअरटेकरच्या राक्षसी वर्तनाचा संतापजनक प्रकार
  • मोठी बातमी: अ‍ॅडव्होकेट असीम सरोदेंची सनद रद्द , बार कौन्सिलचा मोठा निर्णय
  • : भाजपकडून राज ठाकरेंवर प्रहार; उद्धव ठाकरे बंधूंसाठी छातीचा कोट करुन उभे राहिले, धडाधड प्रत्युत्तर दिले,
  • पराभूत होताच दक्षिण अफ्रिकेचे खेळाडू ढसाढसा रडू लागले; टीम इंडियाचे खेळाडू धावले, वर्ल्डकपच नव्हे मनंही जिंकले
  • वर्ल्डकपची मोहीम फत्ते, आता लगीनघाई; स्मृती मानधनावर होणाऱ्या नवऱ्याकडून कौतुकाची उधळण
  • पुणे पोलिसांच्या नाकावर टिच्चून गणेशला संपवलं; आंदेकर Vs कोमकर गँगवॉर पुन्हा भडकलं, मिसरुडही न फुटलेल्या लहान मुलांचा वापर
 विश्लेषण

भाजपकडून राज ठाकरेंवर प्रहार; उद्धव ठाकरे बंधूंसाठी छातीचा कोट करून उभे राहिले, धडाधड प्रत्युत्तर दिले

डिजिटल पुणे    03-11-2025 14:27:16

मुंबई :  मतदारचे ओळख केंद्र आम्ही शाखेत सुरु करणार आहोत. सक्षम अँप आणि निवडणूक आयोग सर्व्हर हे आयोग हाताळत नाही, असा संशय आम्हाला आहे. कोणीतरी माझ्या नावाने अँपमध्ये रजिस्टर केलं आणि मग ओटीपी आला असणार, ज्यातून माझे आणि माझ्या कटूबांचे नाव वगळले गेले असते. आम्ही मतदारांना सांगतो तुम्ही शाखेमध्ये या. तुमच्या नावात गोंधळ नाही ना? तुमची नावं तपासून घ्या. हि सगळी निवडणूक आयोगाची  भूताटकी आहे. त्यामुळे दुसरे कोणी मतदार तुमच्या पत्यावर असतील तर ते निदर्शनास आणून द्या. सरकार झेन-जीला घाबरतय. आम्ही सांगतोय निवडणूक आयोगाची करप्ट प्रॅक्टिस असल्याचे सांगत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकार आणि निवडणूक आयोगावर सडकून टीका केली आहे.

राज्यातील मतदार यादीतील गोंधळ आणि निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकार आणि निवडणूक आयोगावर तीव्र टीका करताना म्हटलं की,“आयोग हाताळत नाही असं वाटावं अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कोणीतरी माझ्या नावाने अॅपमध्ये रजिस्टर केलं, ओटीपी आला आणि नाव वगळलं गेलं असं प्रकार होऊ शकतात. त्यामुळे मतदारांनी स्वतःची नावे शाखांमध्ये जाऊन तपासावीत. निवडणूक आयोगाची ही सगळी भूताटकी आहे.”

पहिला मुद्दा शेतकऱ्यांचा खरीप हंगाम गेलाय. आम्ही मोर्चा काढला होता, आमची मागणी होती कि, शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे. आत्ता केंद्राचा पथक तीन दिवस पाहणी करणार आहे. आता पाहणी करणार कधी आणि प्रस्ताव देणार कधी? शेतकऱ्यांचे पुढच्या वर्षी जूनमध्ये कर्जमाफी होणार तर आताचे हप्ते भरायचे कीं नाही भरायचे? मी मुख्यमंत्री असताना कर्जमाफी केली होती. महात्मा फुले कर्जमाफीचा दुसरा टप्पा जाहीर करावा, कारण डेटा तसाच आहे, आमच्याकडे कुठलीही समिती नव्हती. दिवाळी आधी पैसे शेतकऱ्यांना मिळतील, हे मुख्यमंत्री फडणवीस यांनी पोकळ आश्वासन दिलं होतं. आत्ता ते मिळाले की नाही ते बघू असे असताना

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले  “सरकार झेनजीला घाबरतंय. शेतकऱ्यांचा खरीप हंगाम गेला, पण कर्जमाफीचा निर्णय अजून लांबणीवर आहे. मी मुख्यमंत्री असताना महात्मा फुले कर्जमाफी केली होती. आता केंद्राचं पथक पाहणी करायला आलंय, पण त्यातून शेतकऱ्यांना काहीच मिळणार नाही.”ते पुढे म्हणाले, “आत्ता मी मराठवाडा दौऱ्यावर जाणार आहे. ज्या पॅकेजचं आश्वासन दिलं त्यातले किती पैसे आले हे बघणार आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी आहे.”

आशिष शेलार यांना टोला

उद्धव ठाकरे म्हणाले, “मी आशिष शेलार यांचं अभिनंदन करतो. त्यांनी नकळत देवेंद्र फडणवीसांना ‘पप्पू’ ठरवलं आहे. मतचोरीचा मुद्दा मान्यच नव्हता, पण त्यांनीच सिद्ध केलं की मतदार याद्यांमध्ये गोंधळ आहे. हा त्यांच्या अंतर्गत वादाचा परिणाम आहे.”

 भाजपची पलटवार

दरम्यान, भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीवर गंभीर आरोप केला.ते म्हणाले,“गळा मतचोरीचा... पण पुळका ‘व्होट जिहाद’चा! महाविकास आघाडीने प्रामाणिक मतदारांची नावे वगळून ‘व्होट जिहाद’चा डाव रचला आहे.त्यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावरही आरोप केला की,“राज ठाकरे सुद्धा व्होट जिहाद करत आहेत.”

 राज ठाकरेंचा पुराव्यासह हल्ला

मुंबईत मनसे आणि महाविकास आघाडीच्या वतीने ‘सत्याचा मोर्चा’ काढण्यात आला.या वेळी राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या मतदार यादीतील गोंधळाचे पुरावे सादर करत म्हणाले,“मतदार यादीमध्ये प्रचंड गोंधळ आहे. निवडणुका घेण्याची घाई का? मतदार याद्या साफ झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नका.”दरम्यान, नुकताच मनसे आणि महाविकास आघाडीच्या वतीने मुंबईत 'सत्याचा मोर्चा' काढण्यात आला. त्यावेळी राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या मतदार यादीमध्ये मोठा घोळ असल्याचे सांगत पुरावे सादर केले. सोबतच पुराव्याचा भला मोठा गठ्ठाच समोर आणला. मतदार यादीमध्ये घोळ असताना निवडणूक घेण्याची घाई का? आतापर्यंत पाच वर्षे निवडणुका पुढे ढकलल्या, अजून एक वर्ष पुढे ढकला. पण मतदार याद्या साफ झाल्याशिवाय निवडणुका घेऊ नका, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.राज ठाकरेंनी निवडणूक आयोगाच्या 1 जून 2025 च्या मतदार यादीचा संदर्भ देत राज्यातील लोकसभा मतदारसंघामध्ये किती प्रमाणात दुबार मतदार आहेत याची यादीच वाचून दाखवली.

राज ठाकरेंनी 1 जून 2025 च्या यादीचा दाखला देत दुबार मतदारांची आकडेवारी समोर ठेवली 

कोणत्या मतदारसंघामध्ये किती दुबार मतदार?

मुंबई उत्तर - 62,370 दुबार मतदार (एकूण मतदार-17,29,456)

मुंबई उत्तर पश्चिम - 60,231 दुबार मतदार (एकूण मतदार- 16,74,861)

मुंबई उत्तर पूर्व - 92,983 दुबार मतदार (एकूण मतदार-15,90,710)

मुंबई उत्तर मध्य - 63,740 दुबार मतदार (एकूण मतदार-16,81,048)

मुंबई दक्षिण मध्य - 55,565 दुबार मतदार (एकूण मतदार- 14,37,776)

मुंबई दक्षिण - 55,205 दुबार मतदार (एकूण मतदार- 15,15,993)

नाशिक - 99,673 दुबार मतदार(एकूण मतदार- 19,34,359)

मावळ - 1,45,636 दुबार मतदार (एकूण मतदार- 19,85,172)

पुणे - 1,02,002 दुबार मतदार (एकूण मतदार- 17,12,242)

ठाणे - 2,09,981 दुबार मतदार (एकूण मतदार-25,07,372)

 एकंदरीत, निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातील राजकीय तापमान चढले असून, मतदार यादीतील गोंधळ हा आता राजकारणाचा केंद्रबिंदू बनला आहे.शिवसेना, मनसे आणि भाजप या तिन्ही पक्षांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांची झड उडवली आहे.


 Give Feedback



 जाहिराती