सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • भयंकर! गतिमंद मुलांना कुकरच्या झाकणांसह लाथा बुक्क्यांनी मारहाण, शिपाई अन् केअरटेकरच्या राक्षसी वर्तनाचा संतापजनक प्रकार
  • मोठी बातमी: अ‍ॅडव्होकेट असीम सरोदेंची सनद रद्द , बार कौन्सिलचा मोठा निर्णय
  • : भाजपकडून राज ठाकरेंवर प्रहार; उद्धव ठाकरे बंधूंसाठी छातीचा कोट करुन उभे राहिले, धडाधड प्रत्युत्तर दिले,
  • पराभूत होताच दक्षिण अफ्रिकेचे खेळाडू ढसाढसा रडू लागले; टीम इंडियाचे खेळाडू धावले, वर्ल्डकपच नव्हे मनंही जिंकले
  • वर्ल्डकपची मोहीम फत्ते, आता लगीनघाई; स्मृती मानधनावर होणाऱ्या नवऱ्याकडून कौतुकाची उधळण
  • पुणे पोलिसांच्या नाकावर टिच्चून गणेशला संपवलं; आंदेकर Vs कोमकर गँगवॉर पुन्हा भडकलं, मिसरुडही न फुटलेल्या लहान मुलांचा वापर
 जिल्हा

बारामती पॉवर मॅरेथॉन एकतेचा संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम – मंत्री मकरंद पाटील

डिजिटल पुणे    03-11-2025 14:34:43

बारामती : बारामती पॉवर मॅरेथॉन हा केवळ एक क्रीडा उपक्रम नाही, तर आरोग्यदायी जीवनशैलीचा उत्सव आणि सामूहिक एकतेचा संदेश देणारा प्रेरणादायी उपक्रम आहे, असे प्रतिपादन राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केले.मंत्री पाटील यांच्या हस्ते बारामती स्पोर्ट फाउंडेशन यांच्यावतीने आयोजित बारामती पॉवर मॅरेथॉनला झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील,उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विशेष कार्यकारी खासगी सचिव विकास ढाकणे,  उपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सुनील मुसळे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, एमआयडीसी बारामतीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, उप विभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार गणेश शिंदे, तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले, बारामती पॉवर मॅरेथॉनचे आयोजक सतीश ननावरे आदी उपस्थित होते.मंत्री पाटील यांनी मरेथॉनचे आयोजक आणि सहभागी धावपटूंना शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे अभिनंदन केले.मंत्री पाटील म्हणाले, बारामतीने क्रीडाक्षेत्रात आपली ओळख निर्माण केली आहे आणि अशा उपक्रमांमुळे तरुण पिढीला नवचैतन्य मिळते, या निमित्ताने बारामतीमध्ये उत्साह, जोश आणि ऊर्जेचा संगम अनुभवायला मिळाला.

मुख्य स्पर्धेत ४२.२ किमी फुल मॅरेथॉन, २१.१ किमी हाफ मॅरेथॉन, १० किमी रन आणि ५ किमी फन रन अशा चार गटांमध्ये स्पर्धा पार पडली. बारामती पॉवर मॅरेथॉन सिझन-३ मध्ये ५ हजारांहून अधिक धावपटूंचा उत्स्फूर्त सहभाग घेतला; विभागनिहाय मॅरेथॉन स्पर्धेचा निकाल पुढील प्रमाणे.

४२.२ किमी-महिला गट

१.आरती – वय गट: ४० ते ४९ वर्षे महिला – वेळ: ०३:५०:३७

२.राजनी सिंग – वय गट: ३० ते ३९ वर्षे महिला – वेळ: ०३:५१:३७

३. सिंधू उमेश – वय गट: ३० ते ३९ वर्षे महिला – वेळ: ०३:५४:५५

४२.२ किमी-पुरुष गट

१.बबलू पाटिंग चव्हाण – वय गट: १८ ते २९ वर्षे पुरुष – वेळ: ०२:४२:२५

२. प्रदीप केरकेट्टा – वय गट: ३० ते ३९ वर्षे पुरुष – वेळ: ०२:५०:१६

३. योगेश सानप – वय गट: ३० ते ३९ वर्षे पुरुष – वेळ: ०३:०१:००

२१.१ किमी-महिला गट

१. प्रियांका दादाजी देोरे – वय गट: १८ ते २९ वर्षे महिला – वेळ: ०१:३५:२०

२. अभिलाषा मोडेकर – वय गट: ३० ते ३९ वर्षे महिला – वेळ: ०१:४२:३०

३. सौम्या पिल्लई – वय गट: ३० ते ३९ वर्षे महिला – वेळ: ०१:४६:५६

२१.१ किमी-पुरुष गट

१. विशाल विष्णू कंबिरे – वय गट: ३० ते ३९ वर्षे पुरुष – वेळ: ०१:११:१६

२. लेट चांगदेव हिरामन – वय गट: ३० ते ३९ वर्षे पुरुष – वेळ: ०१:११:५२

३. सुजल सोमनाथ सावत – वय गट: १८ ते २९ वर्षे पुरुष – वेळ: ०१:२०:२५

१० किमी-महिला गट

१. सुरेखा रामा माताणे – वय गट: १८ ते २९ वर्षे महिला – वेळ: ००:४१:५२

२. रोशनी भूषण निशाद – वय गट: १८ ते २९ वर्षे महिला – वेळ: ००:४४:१४

३. काजल भालचंद्र यादव – वय गट: १८ ते २९ वर्षे महिला – वेळ: ००:५१:३३

१० किमी-पुरुष गट

१. देशराज मीणा – वय गट: ३० ते ३९ वर्षे पुरुष – वेळ: ००:३५:०५

२. कुनाल जाधव – वय गट: १८ ते २९ वर्षे पुरुष – वेळ: ००:३६:३३

३. गौरव पवार – वय गट: १८ ते २९ वर्षे पुरुष – वेळ: ००:३७:०८

स्पर्धेतील ठळक बाबी

 नागपूर येथील सात वर्षांची कुमारी आर्या पंकज टाकोणे हिने ५ किमी धाव २५ मिनिटांत पूर्ण करत वर्ल्ड रेकॉर्ड नोंदविण्यात आला.उपमुख्यमंत्री यांचे खासगी सचिव डॉ. अमर भडंगे, क्रीडा मंत्री यांचे विशेष कार्यकारी अधिकारी सुनील आगरकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी या मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला. समारोपाप्रसंगी विजेत्या धावपटूला पारितोषिक वितरण करण्यात आले.


 Give Feedback



 जाहिराती