व्हिएतनाम / पुणे : भारती विद्यापीठाचे महिला अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे यांना व्हिएतनाम येथील न्हा ट्रांग युनिव्हर्सिटी मध्ये आयोजित “इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन नेटवर्किंग अँड कोलॅबोरेशन विदिन एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स अँड अवॉर्ड्स-२०२५” या आंतरराष्ट्रीय परिषदेत ‘बेस्ट एज्युकेशनल इन्स्टिट्यूट अवॉर्ड-२०२५’ या प्रतिष्ठित सन्मानाने गौरविण्यात आले.
हा पुरस्कार न्हा ट्रांग युनिव्हर्सिटीचे उपकुलगुरू प्रा. डॉ. फाम क्वोक हंग यांच्या हस्ते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव यांनी स्वीकारला. हा सन्मान संस्थेच्या शैक्षणिक गुणवत्ता, नवोन्मेषी उपक्रम आणि महिला सशक्तीकरण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल म्हणून प्रदान करण्यात आला.
प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव यांच्या दूरदृष्टीपूर्ण आणि प्रेरणादायी नेतृत्वाखाली महाविद्यालयाने शिक्षण, संशोधन आणि नवोन्मेष या क्षेत्रांत नवे मापदंड प्रस्थापित केले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालय आज जागतिक पातळीवर उत्कृष्टतेचे आणि स्त्रीशक्तीच्या सशक्ततेचे प्रतीक बनले आहे.
या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल भारती विद्यापीठाचे कार्यवाह मा. डॉ. विश्वजीत कदम, कुलपती मा. डॉ. शिवाजीराव कदम आणि मा. डॉ. अस्मिताताई जगताप यांनी प्राचार्य डॉ. प्रदीप जाधव व संपूर्ण महिला अभियांत्रिकी महाविद्यालयाचे मनःपूर्वक अभिनंदन करून नमूद केले की, “हा सन्मान भारती विद्यापीठाच्या शैक्षणिक उत्कृष्टतेचा, नवोन्मेषी दृष्टीकोनाचा आणि महिला सशक्तीकरणासाठीच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा जागतिक गौरव आहे.”
भारती विद्यापीठाचे महिला अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे आज उच्च शिक्षणाच्या क्षेत्रात उत्कृष्टतेचा दीपस्तंभ ठरले आहे. हा सन्मान भारताच्या शैक्षणिक प्रगतीचा आणि भारती विद्यापीठाच्या ज्ञानपरंपरेचा जागतिक स्तरावरील अभिमानास्पद झळाळता क्षण ठरला आहे.
