उरण : भारतीय मजदूर संघाच्या ७० व्या वर्धापन दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, त्याच अंतर्गत भारतीय मजदूर संघ – महाराष्ट्र प्रदेश महिला अभ्यास वर्ग दिनांक १ व २ नोव्हेंबर २०२५ रोजी सौदामिनी सभागृह, मंगळवार पेठ, पुणे येथे आयोजित करण्यात आला . या अभ्यासवर्गात मार्गदर्शन करताना खासदार डॉ. मेधाताई कुलकर्णी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की,“आंगणवाडी, आशा वर्कर , बांधकाम कामगार, घरेलु कामगार, पुणे मेट्रोतील कामगार व इतर महिला कामगारांच्या विविध प्रलंबित प्रश्नांबाबत सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ठाम प्रयत्न करेन.” असे प्रतिपादन केले आहे . या वेळेस विविध उद्योगातील महिला कामगारांच्या समस्यां जाणुन घेतल्या.
अभ्यासवर्गात विविध शासकीय योजना, कामगारांना मिळणारे अल्प वेतन, सामाजिक सुरक्षा, तसेच कार्यपद्धतीतील तृटी या विषयांवर सखोल चर्चा झाली.महिला आरोग्य विषयावर बोलताना डाॅ. मुक्ता उमरजी (एम.डी. गायनॅकॉलॉजिस्ट) म्हणाल्या, “महिला कार्यकर्त्यांनी स्वतःच्या आरोग्याला प्राधान्य दिल्यास सशक्त कुटुंब आणि सुदृढ समाज निर्माण होईल. तसेच नियमित तपासणी करून योग्य उपचार घेतले पाहिजेत.
अभ्यासवर्गात कार्यकर्ता या बाबत तृप्ती आळती, कामगार संघटनेचा इतिहास वंदना कामठे यांनी असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या विविध शासकीय योजना बाबतीत हरी चव्हाण यांनी व शर्मीला पाटील यांनी महिला नेतृत्व या विषयावर मार्गदर्शन केले.तसेच भारतीय मजदूर संघ राष्ट्रीय उपाध्यक्ष निता चोबे यांनी या अभ्यासवर्गाचा उद्देश म्हणजे संघटनेतील महिला कार्यकर्त्यांना संघटनात्मक, सामाजिक आणि कामगार क्षेत्रातील विषयांवर प्रशिक्षण देणे हा आहे.व्यक्तिमत्त्व विकास,असंघटित क्षेत्रातील महिला कामगारांसाठीच्या कल्याणकारी योजना, कामगार क्षेत्रातील नवीन आव्हाने आणि उपाययोजनांबाबत अभ्यास वर्गात प्रशिक्षण घेवुन सक्रिय पणे कार्यरत रहावे असे मनोगत निता चौबे यांनी व्यक्त केले आहे.
चिंतन सत्रात राहुल पुंडे यांनी पंचपरिवर्तन या विषयात मार्गदर्शन केले.नोकरी करणाऱ्या महिलांनी कुटुंब आणि नोकरी यांच्यासह वेळेचे नियोजन करून सामाजिक काम करावे असे मनोगत संध्या देशपांडे यांनी मांडले.सहभागी महिलांना प्रशस्ती पत्र देऊन भारतीय मजदूर संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अँड अनिल ढुमणे यांनी समारोप केला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अँड. अनिल ढुमणे (प्रदेशाध्यक्ष, भारतीय मजदूर संघ – महाराष्ट्र) होते.कार्यक्रमास नीता चोबे (राष्ट्रीय उपाध्यक्षा, भारतीय मजदूर संघ), शिल्पा देशपांडे, बाळासाहेब भुजबळ, अर्जुन चव्हाण, सचिन मेंगाळे, हरी चव्हाण, सागर पवार,उमेश विश्वाद,सुभाष सावजी तसेच रायगड जिल्ह्यातील व विविध जिल्ह्यांतील महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
या अभ्यासवर्गाचे आयोजन आणि समन्वय वंदना कामठे, शर्मिलाताई पाटील, संजना वाडकर ,वनिता सावंत,सुभाष सावजी , सुरेश जाधव, धनंजय इनामदार, वसंत गद्रे, मुकुंद त्रंबके, सचिन मेंगाळे, रोहिणी पाटसकर व कामगार महासंघाचे पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी केले असून त्यांच्या प्रयत्नांमुळे कार्यक्रम अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.