उरण : नागरिकांचे आरोग्य सुदृढ, निरोगी राहावे, आरोग्या विषयी जनजागृती व्हावी, जनतेला चांगली दर्जेदार सेवा सुविधा मिळाव्यात या अनुषंगाने भारतीय जनता पार्टी व कोक्हार्ड फॉउंडेशन, एपीएम टर्मिनल यांच्या संयुक्त विद्यमाने उरण तालुक्यातील पाले गावात आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात नागरिकांची शुगर/ डायबिटीस, रक्तदाब तसेच सर्व मोफत आजार तपासणी करून औषधे देण्यात आले.या शिबिराचा नागरिकांनी मोठया प्रमाणात लाभ घेतला.अमित म्हात्रे शाखा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी,अविनाश म्हात्रे सदस्य वोक्हार्ड फाउंडेशन, फॉउंडेशन चे पदाधिकारी सदस्य, पाले गावचे ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य लाभले.
या आरोग्य शिबीर प्रसंगी रविशेठ भोईर - उरण विधानसभा अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य परिषद सदस्य, धनेश गावंड ग्रामीण अध्यक्ष उरण तालुका,मुकेश म्हात्रे ग्रामीण उपाध्यक्ष उरण तालुका,मुकुंद गावंड उरण तालुका उपाध्यक्ष, राणीताई म्हात्रे ग्रामीण महिला मोर्चा अध्यक्ष उरण तालुका,प्रशांत ठाकुर ग्रामीण उरण तालुका सरचिटणीस,विवेकानंद म्हात्रे ग्रामीण उरण तालुका चिटणीस, शैलेश गावंड उरण ग्रामीण युवा मोर्चा अध्यक्ष,शशिकांत पाटील पुर्व विभाग अध्यक्ष,रोशन पाटील सरपंच सारडे,जिवन गावंड माजी जिल्हापरिषद सदस्य, श्रिया फाउंडेशन चे संस्थापक स्मिता संदीप म्हात्रे आदि मान्यवर उपस्थित होते. उत्तम नियोजन असल्यामुळे व चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याने नागरिकांनी या आरोग्य शिबिराचे कौतुक करत आयोजकांचे जाहीर आभार मानले आहेत.