सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अजितदादांचे महत्व कमी करण्यासाठी सुनील तटकरे-प्रफुल्ल पटेल प्रयत्नशील, भाजपला ते मदत करतात; रोहित पवारांचा आरोप
  • हरियाणात प्रत्येक 8 मतदारांमागे एक बोगस मतदार; काँग्रेसचा पराभव बनावट मतदानामुळे – राहुल गांधींचा आरोप
  • एमसीए निवडणुकीचा वाद आता मुंबई उच्च न्यायालयात, तूर्तास पात्र उमेदवारांची यादी जाहीर न करण्याचे न्यायालयाकडून आदेश
 शहर

पुण्यातील पिंपरखेडमधील नरभक्षक बिबट्याचा अखेर शेवट – ड्रोनच्या मदतीने वनविभागाची यशस्वी मोहीम

डिजिटल पुणे    05-11-2025 12:14:16

पुणे (शिरूर): शिरूर तालुक्यातील पिंपरखेड गावात गेल्या महिनाभरापासून दहशत माजवणाऱ्या नरभक्षक बिबट्याचा अखेर रात्री उशिरा वनविभागाने बंदोबस्त केला. ड्रोनच्या सहाय्याने बिबट्याचा ठावठिकाणा लागल्यानंतर त्याला पकडण्यासाठी डार्ट मारण्यात आला. मात्र डार्टचा नेम चुकल्याने बिबट्या सावध झाला आणि वनकर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दोन शार्प शूटरने प्रत्युत्तरादाखल तीन राऊंड फायर केल्याने हा नर बिबट्या ठार झाला.

गेल्या महिनाभरापासून पिंपरखेड आणि परिसराला हादरवणाऱ्या नरभक्षक बिबट्याचा अखेर शेवट झाला आहे. रात्री उशिरा झालेल्या थरारक मोहिमेत वनविभागाने ड्रोन आणि थर्मल कॅमेऱ्यांच्या मदतीने बिबट्याचा माग काढला, पण डार्टचा नेम चुकल्याने बिबट्या चवताळला आणि प्रतिहल्ला चढवला.त्या क्षणी दोन शार्प शूटरांनी जीव धोक्यात घालून तीन गोळ्या झाडल्या — आणि या नरभक्षकाचा कहर संपला. सुमारे सहा वर्षांचा नर बिबट्या जागीच कोसळला.

६ वर्ष वयाचा नर जातीचा हा बिबट्या मागील महिन्यात तीन जणांचा बळी घेतल्याचे नमुन्यांवरून आणि ठशांवरून स्पष्ट झाले आहे. घटनेच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांमध्ये संताप उसळला होता. २ नोव्हेंबर रोजी झालेल्या रोहनच्या दुर्दैवी मृत्यूनंतर ग्रामस्थांनी वनविभागाच्या वाहनांची आणि बेस कॅम्प इमारतीची जाळपोळ केली होती. तसेच ३ नोव्हेंबरला संतप्त नागरिकांनी पुणे–नाशिक महामार्ग तब्बल १८ तास रोखून धरला होता.हा तोच नरभक्षक, ज्याने ५ वर्षांची शिवन्या बोंबे, ८२ वर्षांच्या भागुबाई जाधव आणि १३ वर्षीय रोहन बोंबे या तीन निरपराधांचा जीव घेतला होता. फक्त ४०० मीटर अंतरावर, जिथे रोहनवर हल्ला झाला होता, तिथेच हा बिबट्या ठार करण्यात आला.

संपूर्ण गावाने गेल्या काही दिवसांत या बिबट्याच्या भीतीने झोप हरवली होती. २ नोव्हेंबरला रोहनच्या मृत्यूनंतर संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाच्या वाहनांची आणि बेसकॅम्पची जाळपोळ केली, तर ३ नोव्हेंबरला पुणे–नाशिक महामार्ग तब्बल १८ तास ठप्प ठेवला होता.वनसंरक्षक आशिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम हाती घेण्यात आली. रेस्क्यू टीम पुणेचे डॉ. सात्विक पाठक, जुबिन पोस्टवाला आणि डॉ. प्रसाद दाभोळकर यांनी रात्री १०.३० वाजता ही मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केली.

शवविच्छेदनासाठी बिबट्याचे पार्थिव माणिकडोह बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले असून, तोच नरभक्षक असल्याचे ठसे व नमुन्यांवरून स्पष्ट झाले आहे.दरम्यान, शिरूर, जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्यातील बिबटे–मानव संघर्ष कमी करण्यासाठी सरकारने १४०० बिबटे गुजरातसह इतर जिल्ह्यांच्या वनक्षेत्रात स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव केंद्राकडे सादर करण्याची तयारी सुरू केली आहे.

या गंभीर परिस्थितीवर उपाय म्हणून प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव तथा मुख्य वन्यजीव रक्षक यांच्या परवानगीने विशेष मोहीम राबवण्यात आली. वनसंरक्षक (पुणे) आशिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली. पुण्यातील रेस्क्यू टीम आणि शार्प शूटर डॉ. सात्विक पाठक, जुबिन पोस्टवाला आणि डॉ. प्रसाद दाभोळकर यांच्या सहाय्याने रात्री १०.३० वाजता बिबट्याला ठार करण्यात आलं.

वनविभागाने परिसरात ३० पिंजरे उभारले असून, गेल्या दोन दिवसांत दोन बिबट्यांना जेरबंद करण्यात आले आहे. या नरभक्षक बिबट्याचे शवविच्छेदन माणिकडोह बिबट निवारा केंद्रात करण्यात येणार आहे.दरम्यान, शिरूर, जुन्नर, आंबेगाव आणि खेड या तालुक्यांतील मानवी–बिबट संघर्षावर नियंत्रण आणण्यासाठी १४०० बिबटे गुजरात व इतर जिल्ह्यांतील वनक्षेत्रात स्थलांतरित करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राकडे सादर करण्याची तयारी सुरू केली आहे.

मुख्य ठळक मुद्दे:

पिंपरखेडमध्ये नरभक्षक बिबट्या ठार

ड्रोन आणि थर्मल कॅमेऱ्यांच्या मदतीने शोध मोहीम

शार्प शूटरचे तीन राऊंड फायर – ठार बिबट्या

तीन जणांचा बळी घेतल्याची खात्री

परिसरात ३० पिंजरे आणि ३ ड्रोन तैनात

संतप्त ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर वनविभागाची तातडीची कारवाई


 Give Feedback



 जाहिराती