पुणे : गेल्या काही काळापासून एका मागोमाग एक दिग्गज नेते आजारी पडत आहेत. याआधी संजय राऊत यांना देखील त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शिवाय यात भाजपच्या नेत्या नवनीत राणा यांचा देखील नंबर आहे. यांच्यानंतर आता पुण्याच्या राज्यसभेच्या खासदार मेधा कुलकर्णी यांची प्रकृती देखील अचानक बिघडल्याचे माहिती समोर येत आहे.
मेधा कुलकर्णी यांनी यासंदर्भात माहिती सोशल मीडियावर पोस्ट करत समर्थकांसह कार्यकर्त्यांना कळवली आहे. “प्रकृती अस्वस्थतेमुळे मी उपचारार्थ रुग्णालयामध्ये दाखल झाले आहे. त्यामुळं काही दिवस आपल्या संपर्कात नसेन, त्याबद्दल दिलगीर व्यक्त करते. काही काम असल्यास आपण माझ्या कार्यालयाशी सहज संपर्क करू शकता. प्रकृतीत सुधारणा झाल्यावर लवकरच भेटू” असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. पण त्यांना नेमकं काय झालं आहे याबाबत अद्याप कोणतीही स्पष्ट महिती समोर आली नाही.
शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे काही दिवसांपूर्वीच रुग्णलयात दाखल झाले आहेत. नेहमीच्या वैद्यकीय तपासणीसाठी ते अॅडमिट झाल्याची चर्चा होती. पण आजार गंभीर स्वरुपाचा असल्यानं पुढील चार महिने आपण सार्वजनिक जीवनात उपलब्ध नसू पण नंतर पुन्हा जोमानं काम करु अशा आशयाचं ट्विट त्यांनी केलं आहे.तर खासदार नवनीत राणा या देखील काही दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल झाल्या आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु असल्यााचे फोटोही व्हायरल झाले होते.