मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवारांच्या कंपनीने 1800 कोटींची जमीन केवळ 300 कोटींमध्ये घेतली तसंच यासाठी स्टँप ड्युटी म्हणून केवळ 500 रूपये मोजल्याचा गंभीर आरोप केलाय. महत्वाचं म्हणजे पार्थ पवारांनी कोरेगाव पार्कात आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारीही चालवली, एक लाखाचे भांडवल असलेल्या कंपनीला हे कसे काय शक्य होते, असा सवाल अंबादास दानवेंनी उपस्थित केलाय. या व्यवहारासाठी उद्योग संचालनालयाने 48 तासात स्टॅम्प ड्युटीही माफ केली, तर केवळ 27 दिवसांत हा व्यवहार झाला, असे देखील त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणावरून विरोधकांनी अजित पवारांसह पार्थ पवारांवर जोरदार हल्लाबोल केलाय. आता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या कंपनीवर तब्बल 1800 कोटींच्या जमिनीचा फक्त 300 कोटींमध्ये व्यवहार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. शिवसेना (ठाकरे गट) नेते अंबादास दानवे यांनी हा आरोप करताना, या व्यवहारात फक्त 500 रुपयांची स्टॅम्प ड्युटी भरल्याचे आणि उद्योग संचालनालयाने 48 तासांत ड्युटी माफ केल्याचे म्हटले आहे.दानवे यांनी प्रश्न उपस्थित केला की, “एक लाख रुपयांच्या भांडवलाची कंपनी एवढा मोठा प्रकल्प आयटी पार्क आणि डेटा सेंटर उभारण्याची तयारी कशी काय करू शकते?”
या प्रकरणावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून, त्यांनी सांगितले की, “मी या व्यवहाराची सर्व माहिती महसूल विभाग, आयजीआर आणि लँड रेकॉर्डकडून मागवली आहे. प्राथमिक चौकशीचे आदेश दिले आहेत. मुद्दे गंभीर असल्याने संपूर्ण माहिती आल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल.”फडणवीस पुढे म्हणाले, “उपमुख्यमंत्री अजित पवार देखील अशा प्रकाराला पाठिंबा देणार नाहीत, याची मला खात्री आहे. कुठेही अनियमितता आढळल्यास कडक कारवाई केली जाईल
.दरम्यान, या प्रकरणावर पार्थ पवार यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “मी कोणताही गैरव्यवहार केलेला नाही,”असे त्यांनी फोनवरून सांगितले. मात्र, यापलीकडे त्यांनी कोणतीही अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.