सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • वाघाने वनरक्षकावर हल्ला केलेला 'तो' व्हिडीओ खोटा; ‘एआय’ तंत्रज्ञानाने बनवल्याचा वन विभागाचा दावा
  • : माझ्या मताशी श्रीमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवारही पूर्णपणे सहमत असतील, पुणे जमीन घोटाळ्यावर देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य
  • 'आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची' आता राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर मुक्ताफळे
  • 300 कोटी घेऊन शीतल तेजवानी नवऱ्यासह परदेशात पळून गेली? पुणे पोलिसांकडून शोधाशोध सुरु
  • पुण्याच्या 40 एकर जमीन व्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल, शीतल तेजवानी,रवींद्र तारु आणि पार्थ पवारांचे भागीदार दिग्विजय पाटील यांच्याविरोधात तक्रार
 विश्लेषण

श्री क्षेत्र कपिलधार येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

डिजिटल पुणे    07-11-2025 10:27:41

कपिलधार :- वीरशैव लिंगायत समाजाची पंढरी समजल्या जाणाऱ्या श्रीक्षेञ कपिलधार जि.बीड येथे सोळाव्या शतकातील थोर संत, संत शिरोमणी श्री मन्मथ स्वामी यांच्या शिव साक्षात्कार दिनानिमित्त आयोजित भव्यदिव्य याञेत उमरखेड जि.यवतमाळ येथील पार्वती हेल्थ फाउंडेशन, उमाम्हेश्वर मन्मथ ज्योत यात्रा विडुळ,वीरशैव जंगम समाज संघटना, वीरशैव लिंगायत समाज संघटना उमरखेड यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय मोफत सर्व रोग तपासणी चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये मन्मथमाऊलींच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी तहानभूक हरवून,शिवनामामध्ये तल्लीन होऊन,सतत दहा ते पंधरा दिवसांपासून राज्यातील तसेच तेलंगाना,कर्नाटक व आंध्र प्रदेशातुन पायी दिंडीतून येणार्‍या भक्तांसाठी  तसेच राज्यातील तसेच शेजारील राज्यांतुन सुध्दा मन्मथमाऊलींच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांसाठी दिनांक ४ व ५ नोव्हेंबर २०२५ रोजी कपिलधार येथे डॉ विष्णुकांत शिवणकर व डॉ ओंकार मुळावकर यांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते,या शिबीरात महिला १५२० व पुरुष १७४० असे एकूण ३२६० रुग्णांची मोफत तपासणी करून औषधोपचार करण्यात आले. 

या याञेत दिंड्या व भक्तिच्या श्रध्देतुन मन्मथस्वामींच्या दर्शनासाठी लाखो भाविक  सहभागी होत असतात. अनेक दिवसांचा पायी प्रवास करून ह्या दिंड्या कपिलधार येथे पोहचत असतात. त्यांना आरोग्य सेवेची नितांत गरज असते. याची जाणीव ठेऊन पार्वती ग्रुपच्या माध्यमातून मागील वर्षापासून या उपक्रमाची सुरवात करण्यात आली आहे. या टीम मध्ये बालाजी शिरडकर, प्रा. संतोष बिचेवार, प्रभाकर दिघेवार यांनी अतिशय चांगले व्यवस्थापन केले. किसनराव हिंगमिरे, कैलास स्वामी सुकळकर, सावन स्वामी बेंडके, संतोष डोम, अमोल घंटे, रनमले, यांनी निस्वार्थ भावनेने आरोग्य सेवा देण्यात मदत केली. या उपक्रमा करिता वीरभद्र क्लिनिक उमरखेड, मोरया क्लिनिक विडुळ, आरोग्य विभाग, सहस्रबाहु चॅरिटेबल ट्रस्ट उमरखेड, महालिंग स्वामी लातूर यांचे विशेष सहकार्य लाभले. गरजु भाविकभक्तांसाठी अतिशय तन्मयतेने आयोजित या आरोग्य शिबीरास गुरूवर्य दिगांबर शिवाचार्य महाराज थोरलामठ वसमत, गुरूवर्य शंभूलिंग शिवाचार्य महाराज अंबेजोगाई,गुरूवर्य रुद्रमुनी शिवाचार्य महाराज मुदखेड यांनी भेट देऊन उपक्रमाची प्रसंशा केली व आशीर्वाद दिले.तसेच श्री मन्मथस्वामी संस्थानच्या वतीने सुध्दा आरोग्य तपासणी शिबीर आयोजनात सहभागी सर्वांचा यथोचित सन्मान करण्यात आला.पार्वती ग्रुप च्या माध्यमातून विविध आरोग्य शिबिराचे आयोजन नियमित करण्यात येत असल्याबाबत चे मत संस्थेचे सदस्य बालाजी शिरडकर यांनी व्यक्त केले.

 


 Give Feedback



 जाहिराती