सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्याच्या 40 एकर जमीन व्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल, शीतल तेजवानी,रवींद्र तारु आणि पार्थ पवारांचे भागीदार दिग्विजय पाटील यांच्याविरोधात तक्रार
  • पार्थ पवारांनंतर अजितदादांचा दुसरा मुलगाही अडचणीत येणार? ‘टँगो’ दारू कंपनीवरून काँग्रेसचा सनसनाटी आरोप
  • मोठी बातमी: शिंदे अन् ठाकरेंची शिवसेना एकत्र येण्याची शक्यता; कोकणात गुप्त बैठक, राजकारणात एकच खळबळ
 व्यक्ती विशेष

मोठी बातमी: कणकवलीत शिंदे-ठाकरे गट एकत्र येणार?कोकणात गुप्त बैठक, राजकारणात एकच खळबळ

डिजिटल पुणे    07-11-2025 13:14:21

मुंबई : सिंधुदुर्गच्या कणकवली नगरपंचायतीत शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. "शहर विकास आघाडी" या नव्या आघाडीच्या नावाने दोन्ही गट एकत्र येण्याची चर्चा रंगली आहे. माजी आमदार वैभव नाईक, राजन तेली, सुशांत नाईक, संदेश पारकर आणि सतीश सावंत यांच्या उपस्थितीत गुप्त बैठक झाल्याची माहिती आहे. संदेश पारकर नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार असतील. दोन दिवसांत निर्णय होण्याची शक्यता असून, या हालचालींमुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कोकणात राजकीय हालचालींना वेग आला आहे. सर्वच पक्ष जोरदार तयारी करत असताना आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतीत शिवसेनेचा शिंदे गट आणि ठाकरे गट एकत्र येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दोन्ही गटांच्या एकत्रीकरणासाठी “शहर विकास आघाडी” या नावाने नव्या आघाडीची चर्चा सुरु आहे. या संभाव्य आघाडीमुळे कोकणच्या राजकारणात खळबळ माजली आहे.

गुप्त बैठक कणकवलीत

कणकवली शहरात झालेल्या एका गुप्त बैठकीला माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली, तसेच स्थानिक नेते सुशांत नाईक, संदेश पारकर आणि सतीश सावंत हे उपस्थित होते. नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गट एकत्र येण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्याचे सूत्रांकडून समजते.

शहर विकास आघाडीची शक्यता

दोन्ही गटातील नेत्यांनी स्थानिक स्तरावरील मतभेद विसरून एकत्र येण्याची तयारी दाखवली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या नव्या आघाडीअंतर्गत संदेश पारकर हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असू शकतात. येत्या दोन दिवसांत यावर अंतिम निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राजन तेली यांचे वक्तव्य

एकनाथ शिंदे यांच्या गटाचे माजी आमदार राजन तेली म्हणाले,“कणकवली शहरातून सर्वांनी मिळून निवडणूक लढवावी आणि ‘शहर विकास आघाडी’ करावी, असा प्रस्ताव आला आहे. अजून त्यावर निर्णय झालेला नाही. प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठवला आहे. अंतिम निर्णय वरिष्ठच घेतील.”ते पुढे म्हणाले,“हा प्रस्ताव फक्त शिवसेनेपुरता मर्यादित नाही. शहरातील विविध समाजसेवी मंडळांचाही यात सहभाग आहे. शहराच्या विकासासाठी एकत्र येणे यात काही गैर नाही. हे भाजपविरोधात नाही, तर विकासासाठीचे एकत्रीकरण आहे.”

ठाकरे गटाचे मत?

उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी स्पष्ट केले होते की, “शिंदेंशी युती होणार नाही.” तरीदेखील कणकवलीतील घडामोडींमुळे राजकीय समीकरणात मोठा बदल घडू शकतो का, हा प्रश्न आता सगळ्यांच्या चर्चेचा विषय ठरला आहे.

कणकवलीत शिंदे आणि ठाकरे गटांच्या एकत्र येण्याच्या चर्चेमुळे कोकणच्या राजकारणात नवा अध्याय उघडण्याची चिन्हं आहेत. ही केवळ स्थानिक पातळीवरील चर्चा आहे की पुढे राज्यातही काही मोठं समीकरण तयार होणार? हे येणारे काही दिवस ठरवतील.


 Give Feedback



 जाहिराती