सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • पुण्याच्या 40 एकर जमीन व्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल, शीतल तेजवानी,रवींद्र तारु आणि पार्थ पवारांचे भागीदार दिग्विजय पाटील यांच्याविरोधात तक्रार
  • पार्थ पवारांनंतर अजितदादांचा दुसरा मुलगाही अडचणीत येणार? ‘टँगो’ दारू कंपनीवरून काँग्रेसचा सनसनाटी आरोप
  • मोठी बातमी: शिंदे अन् ठाकरेंची शिवसेना एकत्र येण्याची शक्यता; कोकणात गुप्त बैठक, राजकारणात एकच खळबळ
 जिल्हा

शिक्षक पात्रता परीक्षेबाबत अधिकृत संकेतस्थळावरील सूचनांचे अवलोकन करावे

डिजिटल पुणे    07-11-2025 16:05:50

मुंबई  : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) 2025 परीक्षचे आयोजन रविवार, 23 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आले आहे. याबाबत सर्व संबंधितांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या www.mscepune.in व http://mahatet.in या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना व माहितीचे अवलोकन करावे. परीक्षेसंबंधी कोणत्याही चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी केले आहे.

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) 2025 च्या आयोजनाची कार्यवाही सुरू असून, परीक्षेसंबंधित कार्यवाहीबाबत वेळोवेळी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर अधिकृत माहिती देण्यात येते. तथापि, परीक्षेसंबंधी यूट्यूब चॅनेल्स, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे व प्रसार माध्यमाद्वारे दिल्या जाणाऱ्या चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या बातम्या/ अफवांवर विश्वास न ठेवता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सूचना व माहितीचे अवलोकन करावे. परीक्षेसंबंधी कोणत्याही चुकीच्या व दिशाभूल करणाऱ्या अफवांवर विश्वास ठेवून झालेल्या नुकसानीस उमेदवार/ विद्यार्थी सर्वस्वी जबाबदार असतील, याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.


 Give Feedback



 जाहिराती