छत्रपती संभाजीनगर – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते सुनिल कौसाडीकर लिखित 13 विविध प्रशासकीय विषयांवरील पुस्तकांचे नुकतेच प्रकाशन करण्यात आले. प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांना दैनंदिन प्रशासकीय कामकाज करतांना ही पुस्तके निश्चित उपयुक्त ठरतील, असा विश्वास श्री. पापळकर यांनी यावेळी व्यक्त केला.
व्दारकानंद प्रकाशन तर्फे प्रकाशित या पुस्तकांमध्ये विभागीय चौकशी (खंड 1 व 2), निवृत्तीवेतन वेळीच कसे मिळेल (खंड 1 व 2), अनुकंपा तत्त्वावरील नेमणुका, वैद्यकीय प्रतीपूर्ती, उद्योग ऊर्जा व कामगार विभागाचे खरेदीबाबतचे शासन निर्णय, ई-निविदाबाबतचे जलसंपदा, ग्रामविकास, सार्वजनिक बांधकाम विभाग व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे शासन निर्णय, ग्रामविकास विभागाचे महत्त्वाचे शासन निर्णय व परिपत्रके(खंड 1 ते 5) या पुस्तकांचा समावेश आहे.पुस्तक प्रकाशनावेळी छत्रपती संभाजीनगर विभागातील जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच विभागीय आयुक्त कार्यालयातील सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.