सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • वाघाने वनरक्षकावर हल्ला केलेला 'तो' व्हिडीओ खोटा; ‘एआय’ तंत्रज्ञानाने बनवल्याचा वन विभागाचा दावा
  • : माझ्या मताशी श्रीमान उपमुख्यमंत्री अजितदादा पवारही पूर्णपणे सहमत असतील, पुणे जमीन घोटाळ्यावर देवेंद्र फडणवीसांचं वक्तव्य
  • 'आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची' आता राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर मुक्ताफळे
  • 300 कोटी घेऊन शीतल तेजवानी नवऱ्यासह परदेशात पळून गेली? पुणे पोलिसांकडून शोधाशोध सुरु
  • पुण्याच्या 40 एकर जमीन व्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल, शीतल तेजवानी,रवींद्र तारु आणि पार्थ पवारांचे भागीदार दिग्विजय पाटील यांच्याविरोधात तक्रार
 शहर

‘अल्पसंख्याकांच्या सक्षमीकरणासाठी शिक्षण’;अखिल भारतीय शैक्षणिक परिषदेचे उद्घाटन

डिजिटल पुणे    08-11-2025 17:37:32

पुणे : ‘अल्पसंख्याकांच्या सक्षमीकरणासाठी शिक्षण’ या विषयावर आधारित दोन दिवसीय, पंधराव्या  अखिल भारतीय शैक्षणिक परिषदेचा उद्घाटन समारंभ आज ८ नोव्हेंबर २०२५ रोजी आझम कॅम्पस,पुणे येथे पार पडला.ही परिषद ऑल इंडिया एज्युकेशनल मूव्हमेंट (एआयइएम),नवी दिल्ली आणि एम.सी.ई.एस.च्या डॉ. पी. ए. इनामदार विद्यापीठ, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली आहे.

शिक्षण तज्ज्ञ प्रा.गुलरेझ अहमद(अलिगढ,)महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष  पाशा पटेल,राज्यसभा सदस्य फौजिया खान,इतिहास अभ्यासक प्रा.राम पुनियानी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या उपाध्यक्षा आबेदा इनामदार या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.देशभरातील नामवंत शिक्षणतज्ज्ञ,धोरणकर्ते आणि सामाजिक विचारवंत या परिषदेत सहभागी झाले.

कार्यक्रमाची सुरुवात स्वागत व परिचयपर भाषणाने झाली, ज्यात डॉ.ख्वाजा एम.शाहिद(माजी प्र-उपकुलगुरू, मौलाना आझाद नॅशनल उर्दू विद्यापीठ,हैदराबाद आणि अध्यक्ष,ऑल इंडिया एज्युकेशनल मूव्हमेंट )यांनी समाजोन्नतीसाठी सुलभ,समावेशक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व स्पष्ट केले.उद्घाटनपर भाषण राज्यसभेच्या  सदस्य व  ऑल इंडिया एज्युकेशनल मूव्हमेंटच्या मार्गदर्शक  डॉ.फौझिया खान यांनी केले. त्यांनी समाजातील सर्व घटकांना समान शैक्षणिक संधी मिळण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज अधोरेखित केली.आबेदा इनामदार यांनी अल्पसंख्याक समाजाच्या सक्षमीकरणासाठी शैक्षणिक मूल्ये अधिक बळकट करण्याच्या संस्थेच्या बांधिलकीचा पुनरुच्चार केला.प्रमुख वक्ते प्रा.गुलरेझ अहमद(माजी प्र-उपकुलगुरू,अलीगढ मुस्लिम विद्यापीठ) यांनी नवोन्मेषाधारित शिक्षण आणि शैक्षणिक दरी भरून काढण्याच्या गरजेवर प्रकाश टाकला.महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष  पाशा पटेल यांनीही भाषण करून शिक्षणाच्या माध्यमातून ग्रामीण विकासात सातत्यपूर्ण प्रगती साधता येते, असे सांगितले.

या प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये प्रा.राम पुनियानी(प्रख्यात इतिहासकार, मुंबई);अब्दुल रशीद(महासचिव,ऑल इंडिया एज्युकेशनल मूव्हमेंट);डॉ.एम.इलियास सैफी(सचिव,ऑल इंडिया एज्युकेशनल मूव्हमेंट );डॉ.एम.ए.लहोरी(कुलगुरू,डॉ.पी.ए.इनामदार विद्यापीठ);प्रा.इरफान शेख(सचिव,एम.सी.ई.सोसायटी) तसेच एच.जी.एम.आझम ट्रस्ट,एम.एम.ई.आर.सी. ट्रस्ट आणि डी.एम.आय. ट्रस्ट, पुणे च्या पदाधिकाऱ्यांचा  समावेश होता.

परिषदेच्या पहिल्या दिवशी शिक्षणाच्या माध्यमातून समानता,सक्षमीकरण आणि राष्ट्रीय एकात्मता यावर विचारमंथन झाले.ऑल इंडिया एज्युकेशनल मूव्हमेंट  आणि डॉ.पी.ए.इनामदार विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांनी आणि स्वयंसेवकांनी केलेल्या समन्वयपूर्ण प्रयत्नांमुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला.


 Give Feedback



 जाहिराती