सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • निवडणुकीत ओबीसींना कमी आरक्षण मिळालं, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा दावा; म्हणाले, निवडणूक आयोगाने फेरविचार करावा
  • मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेत आणि भाजपमध्ये राडा, अनिल परबांचा रुद्रावतार, शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी
 व्यक्ती विशेष

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मनसे ते शिवसेना — रायगडात नवीन राजकीय समीकरण!

डिजिटल पुणे    13-11-2025 09:45:40

रायगड : सोमवार, दि. १० नोव्हेंबर २०२५ रोजी, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा जपणारे, आदरणीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे पट्टशिष्य आणि राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार श्री. एकनाथजी संभाजी शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित कार्यक्रमात, त्यांच्या शुभहस्ते मनसे व्यापारी सेना रायगड जिल्हा संघटक श्री. अमित (भाऊ) महादेव जंगम यांनी आपल्या सहकाऱ्यांसह बाळासाहेबांची शिवसेना पक्षात प्रवेश केला.

या प्रवेशसोहळ्यात सुमित जंगम, दिपक ओमले, केतन ओमले, वासुदेव पाटील, सचिन पाटील, निखिल पाटील, वैभव पाटील, श्रेयश पाटील, कुणाल गायकवाड, उपेंद्र मामा, सुजाता जंगम व इतर अनेक कार्यकर्त्यांचा समावेश होता. श्री. अमित जंगम यांनी समाजातील सर्वसामान्यांच्या न्यायहक्कासाठी सातत्याने केलेले आंदोलन, स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगार प्रश्नांवरील लढा, तसेच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील योगदान या कार्याचा गौरव करून, त्यांना शिवसेना रायगड जिल्हा कामगार सेनेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

या प्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी अमित जंगम यांना शुभाशीर्वाद देत त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारली आणि सर्व नव्या कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. रायगड जिल्ह्यातील शिवसेनेची ताकद वाढवणारा हा निर्णय असून, बाळासाहेबांच्या विचारांना बळ देणारी ही नवी ऊर्जा ठरत आहे.


 Give Feedback



 जाहिराती