सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • धक्कादायक! काँग्रेस नेत्याचा धावत्या रेल्वेतून पडून दुर्दैवी अंत,मुंबईहून चिखलीकडे परतताना काळाचा घाला;राजकीय क्षेत्रात शोककळा
  • तुमच्या मुलाच्या बाबतीत कट रचला असता तर..; मनोज जरांगेंचा धनंजय मुंडेंवरुन अजित पवारांना सवाल
 जिल्हा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योजक श्लोका अंबानी यांच्या पुढाकाराने गडचिरोलीत ‘सोलर शाळा’ उपक्रम

डिजिटल पुणे    13-11-2025 17:44:45

गडचिरोली  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकाराने आणि अंबानी उद्योग समूहातील सदस्य व ‘रोझी ब्लू फाउंडेशन’च्या संचालक श्लोका अंबानी यांच्या सामाजिक सहकार्यातून नक्षलग्रस्त व दुर्गम गडचिरोली जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या सौर ऊर्जीकरणाचा महत्त्वपूर्ण उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

मुख्यमंत्र्यांकडून विशेष कौतुक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोझी ब्लू फाऊंडेशन आणि त्यांच्या स्वयंसेवा प्लॅटफॉर्म ‘कनेक्ट फॉर’च्या सामाजिक कार्याची दखल घेत त्यांचे विशेष कौतुक केले.’कनेक्ट फॉर’च्या संस्थापक श्लोका अंबानी आणि सह-संस्थापक मानिती शाह यांनी गडचिरोली जिल्ह्यावर विशेष लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यानी केले होते.

अंबानी उद्योग समूहातील सदस्य श्लोका अंबानी यांनी नीती आयोगाने ‘आकांक्षित जिल्हा’ म्हणून घोषित केलेल्या गडचिरोलीमध्ये शैक्षणिक पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी घेतलेला पुढाकार अत्यंत प्रशंसनीय असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले. जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून प्रकल्पाला सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

धानोरा तालुक्यातील १० शाळांसाठी सोलर प्रकल्पास मंजुरी

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी 31 ऑक्टोबर 2025 रोजी ‘सोलर शाळा प्रकल्पा’अंतर्गत रोझी ब्लू फाऊंडेशनला काम करण्यास मंजुरी दिली.पहिल्या टप्प्यात फाऊंडेशनने धानोरा तालुक्यातील दहा जिल्हा परिषद शाळांमध्ये सौर ऊर्जेवर आधारित युनिट्स उपलब्ध करून देण्याचा उपक्रम हाती घेतला. यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरा, मुसक्या, सालेभट्टी, रांगी, निमगाव, दुडमला, मुरूमगाव, बन्धोना, तसेच जिल्हा परिषद हायस्कूल धानोरा आणि मोहली या शाळांचा समावेश आहे.या प्रकल्पामुळे शाळांमधील अध्यापन व डिजिटल शैक्षणिक उपक्रमांना वीज पुरवठ्यावरील अवलंबन कमी होऊन अखंड सुविधा मिळेल व या शाळांमधील सुमारे 1,470 विद्यार्थ्यांना याचा थेट लाभ होईल. ‘सोलर शाळा प्रकल्प’ गडचिरोली जिल्ह्यातील शिक्षण प्रणालीसाठी टिकाऊ, स्वच्छ आणि विश्वसनीय ऊर्जा पुरविणारा नवा आदर्श ठरत आहे.


 Give Feedback



 जाहिराती