सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • निवडणुकीत ओबीसींना कमी आरक्षण मिळालं, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा दावा; म्हणाले, निवडणूक आयोगाने फेरविचार करावा
  • मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेत आणि भाजपमध्ये राडा, अनिल परबांचा रुद्रावतार, शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी
 शहर

नवले पुलाजवळील भीषण अपघातात मराठी अभिनेत्याचा मृत्यू; तीन महिन्यांच्या बाळावर पित्याचे छत्र हरपले

डिजिटल पुणे    15-11-2025 16:13:24

पुणे  : पुण्यातील नवले पुलाजवळ गुरुवारी (ता १३) रोजी झालेल्या भीषण अपघातात एका कारमधील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, त्यामध्ये कारचालक असलेला ३० वर्षीय मराठी अभिनेता धनंजय कोळी याचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याबाबतची सविस्तर माहिती समोर आली आहे. दोन ट्रकच्या मधोमध अडकलेल्या कारमधील पाच जणांना बाहेर पडता आलं नाही, आणि अचानक आग लागल्याने आगीत सर्वांचा होरपळून मृत्यू झाला. अपघातावेळी कार चालवत असलेल्या धनंजय कोळी यांच्या घरी तीन महिन्यांपूर्वी चिमुकल्या लेकरांचं आगमन झालं होतं. अपघात झाला तेव्हा त्याची पत्नी आणि मुलगा लातूर येथे होते, तर आई-वडील पुण्यात होते. धनंजय सहा महिन्यांपासून वाहतुकीचा व्यवसाय करत होता. त्यापूर्वी तो एका खासगी कंपनीत काम करत होता. धनंजय मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरचा आहे.

पुण्यातील नवले पुलाजवळ गुरुवारी (१३ जून) झालेल्या भीषण अपघातात आठ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. दोन ट्रकच्या मधोमध अडकलेल्या कारला अचानक आग लागून त्या वाहनातील पाच जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये चिखली येथे वास्तव्यास असलेला ३० वर्षीय मराठी अभिनेते धनंजय कोळी यांचाही समावेश आहे.

धनंजय कोळी हे काही नाटकांमधील भूमिकांमुळे परिचित होते. इन्स्टाग्रामवर त्यांनी स्वतःचा ‘अभिनेता’ असा उल्लेखही केला होता. नाटकासोबत ते गेल्या सहा महिन्यांपासून वाहतुकीचा व्यवसायही सांभाळत होते. त्याआधी ते एका खासगी कंपनीत कार्यरत होते. धनंजय हे मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील होते.

धनंजयंच्या कुटुंबावर दुहेरी आघात

अपघाताच्या वेळी धनंजय कोळी घरी परतत होते. त्यांच्या घरी केवळ तीन महिन्यांपूर्वीच चिमुकल्याचे आगमन झाले होते. अपघाताच्या वेळी त्यांची पत्नी आणि मुलगा लातूर येथे होते, तर आई-वडील पुण्यात होते. या अचानक झालेल्या दुर्घटनेने संपूर्ण कुटुंबात शोककळा पसरली आहे.

नातेवाईकांच्या हळहळीतून परिस्थितीची भीषणता स्पष्ट होते. “धनंजयचा हकनाक बळी गेला. तीन महिन्यांच्या मुलावर पित्याचे छत्र हरपले. तो कधीच वडिलांच्या प्रेमाला ओळखू शकणार नाही,” अशी भावना त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली.

काही दिवसांपूर्वीच धनंजय आणि त्यांच्या पत्नीने शेअर केलेली डोहाळजेवणाची पोस्ट या हसऱ्या कुटुंबातील अखेरची आठवण ठरली असून सोशल मीडियावर त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला जात आहे.नवले पुलाजवळ वारंवार होणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर या दुर्घटनेने पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.


 Give Feedback



 जाहिराती