सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, चाकणमध्ये ठाकरे-शिंदेंची शिवसेना एकत्र
  • ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात गेलेल्या राजन साळवींना झटका, भाजपमुळे रत्नागिरीत मुलाला उमेदवारी नाकारली
  • दुर्धर आजारानंतरही संजय राऊतांमधील शिवसैनिक जागा झाला, मास्क लावून घराबाहेर पडले, स्मृतीस्थळ गाठून बाळासाहेबांना वंदन!
  • निवडणुकीत ओबीसींना कमी आरक्षण मिळालं, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा दावा; म्हणाले, निवडणूक आयोगाने फेरविचार करावा
  • मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेत आणि भाजपमध्ये राडा, अनिल परबांचा रुद्रावतार, शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी
 व्यक्ती विशेष

मोठी बातमी : चाकणमध्ये ठाकरे-शिंदे सेनेची अनपेक्षित युती, नगराध्यक्ष पदासाठी मनिषा गोरेंना दोन्ही गटांचा पाठिंबा

डिजिटल पुणे    17-11-2025 12:03:25

चाकण : शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात टोकाचे वितुष्ट निर्माण झाले असताना आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्यानिमित्ताने महाराष्ट्राच्या राजकारणात एक अनपेक्षित घडामोड घडली आहे. राज्यात कुठंच एकत्र न आलेली ठाकरे अन शिंदेंची शिवसेना चाकणमध्ये  एकत्र आली आहे.चाकण नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी शिंदे शिवसेनेच्या उमेदवार मनिषा सुरेश गोरे यांचा अर्ज भरण्यासाठी ठाकरेंचे स्थानिक आमदार बाबाजी काळे आणि शिंदेचे आमदार शरद सोनवणे उपस्थित होते. आमदार बाबाजी काळे यांनी सांगितले की, दिवंगत आमदार सुरेश गोरेंच्या पश्चात ही पहिली निवडणूक आहे आणि त्यांच्या पत्नीला आदरांजली म्हणून केवळ नगराध्यक्ष पदासाठी पाठिंबा दिला आहे. ही युती नसून, स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याच्या सूचनेनुसार चाकण नगराध्यक्ष पदापुरता मर्यादित निर्णय आहे.

शिवसेनेत फूट पडल्यापासून ठाकरे गट आणि शिंदे गट यांच्यातील वैचारिक दरी सर्वपरिचित आहे. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत चाकणमध्ये मात्र अनपेक्षित राजकीय घडामोड घडली आहे. राज्यात कुठेही एकत्र न दिसलेले दोन्ही गट येथे एकाच उमेदवारासाठी एकत्र उभे राहताना दिसले.

चाकण नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी शिंदे गटाच्या उमेदवार मनिषा सुरेश गोरे यांचा अर्ज दाखल करताना ठाकरे गटाचे आमदार बाबाजी काळे आणि शिंदे गटाचे आमदार शरद सोनवणे हे एकत्र उपस्थित होते.

दिवंगत आमदार सुरेश गोरे यांच्या पश्चात ही पहिली निवडणूक असून, त्यांच्या पत्नी मनिषा गोरे नगराध्यक्षपदासाठी उभ्या राहिल्या आहेत.या संदर्भात बोलताना आमदार बाबाजी काळे म्हणाले कि “ही युती नाही. दिवंगत आमदार सुरेश गोरेंना आदरांजली म्हणून केवळ नगराध्यक्ष पदापुरता आम्ही पाठिंबा दिला आहे. राजकारण बाजूला ठेवून घेतलेला हा स्थानिक निर्णय आहे.”

उद्धव ठाकरे आणि संपर्क प्रमुख सचिन अहिर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य दिल्याने हा निर्णय फक्त चाकणपुरता आणि नगराध्यक्ष पदापुरता मर्यादित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, राजगुरुनगर आणि आळंदीत दोन्ही गट स्वतंत्रपणे, स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचेही बाबाजी काळे यांनी सांगितले.चाकणमध्ये दाखल झालेली ही 'अनपेक्षित जवळीक' केवळ भावनिक आणि स्थानिक स्तरावरचा निर्णय असून, राज्यातील दोन्ही शिवसेना गटांची अधिकृत युती नसल्याचे स्पष्ट झाले आहे.


 Give Feedback



 जाहिराती