सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा पहिला मुस्लिम नगरसेवक विजयी, नाशिक जिल्ह्यात खातं उघडलं
 जिल्हा

अवैधरित्या डिझेलची खरेदी/विक्री करणाऱ्यांविरुध्द कारवाई; १२,४९,६०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त

डिजिटल पुणे    19-11-2025 12:05:45

मुंबई : अवैधरित्या डिझेलची खरेदी/विक्री करणाऱ्यांविरुद्ध करण्यात आलेल्या कारवाईत राज्यस्तरीय दक्षता पथकामार्फत 12,49,600/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती  नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई कार्यालयाने प्रसिद्धीपत्राद्वारे दिली आहे.नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई तथा अध्यक्ष, राज्यस्तरीय दक्षता पथक प्रमुख यांना, मुंबई-अहमदाबाद हायवे, आमगाव, ता. तलासरी, जि. पालघर येथील हॉटेल अरोमा समोरील मोकळ्या जागेत अवैधरित्या डिझेलची खरेदी व साठवणूक करुन तेथूनच त्याची विक्री करीत असल्याच्या प्राप्त खबरीच्या अनुषंगाने गठित राज्यस्तरीय दक्षता पथकामार्फत 12 नोव्हेंबर, 2025 रोजी कारवाई करण्यात आली. या कारवाईमध्ये घटनास्थळी डिझेल सदृश पेट्रोलियम द्रव्य पदार्थाचा 5360 लीटर्स साठा, माल मोटार क्र. जीजे-18-एटी-8865 व इतर वस्तू या प्रमाणे 12,49,600/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या  कारवाईत राज्यस्तरीय दक्षता पथकाचे सदस्य तथा उपनियंत्रक शिधावाटप (अंमल) गणेश बेल्लाळे, मुख्य निरीक्षण अधिकारी नागनाथ हंगरगे, शिधावाटप निरीक्षक, राहुल इंगळे, विकास नागदिवे, राजेश सोरते, रविंद्र राठोड, अमोल बुरटे, देवानंद थोरवे, पवनकुमार कुंभले, राजीव भेले, प्रकाश पराते, अमित पाटील, संदिप दुबे यांनी घटनास्थळी केलेल्या पाहणीत माल मोटार क्र. जीजे-18-एटी-8865 च्या इंधन टाकीमध्ये प्लास्टीक कॅनमधून इंधन भरत असल्याचे दिसून आले.  त्याचवेळी पथकाने, माल मोटार क्र. चा गाडी मालक सत्तर मजिद सालियावाला, परेश अमृतभाई जोशी व आयुष भरतभाई जोशी अशा तीन जणांना पकडले.  या व्यवसायाबाबत त्यांच्याकडे कोणतेही कागदपत्रे व परवाने नसल्याचे त्यांनी पंचासमक्ष सांगितले.

या कारवाईमध्ये घटनास्थळी डिझेल सदृश पेट्रोलियम द्रव्य पदार्थचा 5360 लीटर्स साठा यासह एकूण 12.49,600/- रुपये चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अवैध व्यवसाय करणारे परेश अमृतभाई जोशी, आयुष भरतभाई जोशी, व्यवसायमालक  महेश पांडे, जेम्स लोबो, मालमोटार गाडीमालक सत्तर मजिद सालियावाला तसेच जागा मालक यांनी अवैधरित्या स्वत:च्या फायद्यासाठी मानवी जीवितास धोका निर्माण होईल असे कृत्य करुन जीवनावश्यक वस्तू कायदा 1955 अंतर्गत तरतुदींचा भंग केल्याने  त्यांविरुध्द गुन्हा नोंद क्रमांक 0252/2025 अन्वये तलासरी पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे.


 Give Feedback



 जाहिराती