सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • अजितदादा माफ करा, पदरात घ्या...; अनगरमध्ये बाळराजेंकडून चॅलेंज, आता राजन पाटील यांनी माफी मागितली!
  • थंडीचा कडाका! पुण्यात विक्रमी नीचांकी तापमानाची नोंद, कोकणातील ‘महाबळेश्वर’ असणाऱ्या दापोलीत हाडं गोठवणारी थंडी, परभणीचे तापमान 7 अंशावर
  • ऑनलाईन गेमिंग, शेअर मार्केचा नाद, बँक मॅनेजरच बनला चोर; 1 कोटी 7 लाख घेऊन नागपुरला पळाला
 जिल्हा

नवीन फौजदारी कायद्यांवरील प्रदर्शनाचे आयोजन

डिजिटल पुणे    19-11-2025 15:45:13

मुंबई : केंद्र शासनाने भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे नवीन फौजदारी कायदे १ जुलै २०२४ पासून देशभरात लागू केले आहे. या नवीन फौजदारी कायद्यांवर आधारित प्रदर्शनाचे आयोजन 19 ते 23 नोव्हेंबर 2025 दरम्यान आझाद मैदान, मुंबई येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन 19 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, मुंबई उपनगरचे पालकमंत्री ॲड.आशिष शेलार, मुंबई उपनगरचे सह पालकमंत्री मंगल प्रभात लोढा, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) डॉ. पंकज भोयर, गृह राज्यमंत्री (शहरे) योगेश कदम, खासदार अरविंद सावंत उपस्थित असणार आहेत. तसेच मुख्य सचिव राजेश कुमार, गृह विभागाचे अपर मुख्य सचिव इकबाल सिंह चहल, पोलीस महासंचालक श्रीमती रश्मी शुक्ला उपस्थित राहतील. प्रदर्शन 19 ते 23 नोव्हेंबर या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ या दरम्यान खुले असणार आहे.प्रदर्शनामध्ये नवीन फौजदारी कायद्यांवर आधारित न्याय सहाय्यक शाखा, कारागृहे, जिल्हा न्यायालय, अभियोग संचालनालय आदींचे 14 स्टॉल्स असणार आहेत.


 Give Feedback



 जाहिराती