सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मै सत्यनिष्ठा से... बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमारंचा शपथविधी, रचला नवा विक्रम; मोदींनी जवळ येऊन केलं अभिनंदन
  • गुडन्यूज! निवडणुकांपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार जमा; महाराष्ट्रातील 90 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ
  • अजितदादा माफ करा, पदरात घ्या...; अनगरमध्ये बाळराजेंकडून चॅलेंज, आता राजन पाटील यांनी माफी मागितली!
  • थंडीचा कडाका! पुण्यात विक्रमी नीचांकी तापमानाची नोंद, कोकणातील ‘महाबळेश्वर’ असणाऱ्या दापोलीत हाडं गोठवणारी थंडी, परभणीचे तापमान 7 अंशावर
 व्यक्ती विशेष

मोठी बातमी! माळेगावात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षावर प्राणघातक हल्ला, सुप्रिया सुळे संतापल्या

डिजिटल पुणे    20-11-2025 13:30:41

पुणे : आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे.काही ठिकाणी अर्ज भरण्यावरुन तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे.  राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी आता वेगाने सुरु असून काही ठिकाणी वादाच्या घटना घडत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील अनगर येथे नगरपंचायत निवडणुकी झालेल्या राड्यानंतर आता बारामती तालुक्यातील माळेगाव बु. नगरपंचायतीतही वादाची ठिणगी पडली आहे. एकीकडे बारामती नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून सचिन सातव यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. सचिन सातव यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेसकडून घड्याळाच्या चिन्हावर देण्यात आल्याने येथील राजकीय नाट्य संपुष्टात आले आहे. मात्र, बारामतीमधील माळेगाव बु. नगरपंचायतीच्या निवडणुकीत वाद झाल्याचं समोर आलं आहे. येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या शहराध्यालाच मारहाण करण्यात आल्याने राजकीय वातावरण तापलं आहे.  

माळेगाव नगरपंचायतीमध्ये शरद पवार गट विरुद्ध अजित पवार गटामध्ये राजकीय लढाई पाहायला मिळत आहे. या निवडणुकीच्या रणधुमाळीदरम्यान शरद पवार गटाचे शहराध्यक्ष आणि उमेदवार नितीन तावरे यांना मारहाण झाली आहे. या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. तावरे यांना मारहाण का झाली, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मारहाणीनंतर तावरे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या घटनेची दखल घेत खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर संताप व्यक्त करत इशारा दिला आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विट करुन संताप व्यक्त केला. बारामती तालुक्यातील माळेगाव बु.नगरपंचायतीची निवडणूक लढवित असल्याचा राग मनात धरुन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष नीतीन तावरे यांच्यावर समाजकंटकांनी प्राणघातक हल्ला केला. लोकशाही प्रक्रियेत निवडणूक लढविणे हा नागरीकांचा अधिकार आहे. या अधिकारावरच आक्रमण करुन नागरीकांचा आणि विरोधी पक्षाचा आवाज बंद करण्याचा प्रकार अतिशय संतापजनक आणि दुर्दैवी आहे.

आम्ही सर्वजण या भ्याड हल्ल्ल्याचा निषेध करतो, असे म्हणत राष्ट्रवादीच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी माळेगाव हल्ल्याबाबत आपला संताप व्यक्त केला. तसेच, माझी शासनाला विनंती आहे की, कृपया हा हल्ला करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करावी. नीतीन तावरे हे या हल्ल्यात जखमी झाले आहेत, ते लवकरात लवकर बरे व्हावे, अशी प्रार्थना देखील त्यांनी केली.


 Give Feedback



 जाहिराती