सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मै सत्यनिष्ठा से... बिहारच्या मुख्यमंत्रीपदी नितीश कुमारंचा शपथविधी, रचला नवा विक्रम; मोदींनी जवळ येऊन केलं अभिनंदन
  • गुडन्यूज! निवडणुकांपूर्वीच शेतकऱ्यांच्या खात्यात 2 हजार जमा; महाराष्ट्रातील 90 लाख शेतकऱ्यांना थेट लाभ
  • अजितदादा माफ करा, पदरात घ्या...; अनगरमध्ये बाळराजेंकडून चॅलेंज, आता राजन पाटील यांनी माफी मागितली!
  • थंडीचा कडाका! पुण्यात विक्रमी नीचांकी तापमानाची नोंद, कोकणातील ‘महाबळेश्वर’ असणाऱ्या दापोलीत हाडं गोठवणारी थंडी, परभणीचे तापमान 7 अंशावर
 जिल्हा

अकोला व यवतमाळ येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालये तातडीने सुरू करा – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

डिजिटल पुणे    20-11-2025 17:40:31

मुंबई : वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत अकोला व यवतमाळ येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालये खासगी भागीदारी (पीपीपी) तत्वावर तातडीने सुरू करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.विधानभवनात वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागांतर्गत लातूर, अकोला, छत्रपती संभाजीनगर आणि यवतमाळ येथील चार सुपर स्पेशालिटी रुग्णालये खासगी भागीदारी धोरणानुसार सुरू करण्याबाबत आढावा बैठक झाली. बैठकीस वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरजकुमार, वैद्यकीय शिक्षण व आयुष विभागाचे आयुक्त अनिल भंडारी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.उपाध्यक्ष अण्णा बनसोडे म्हणाले, अकोला व यवतमाळ येथील सुपर स्पेशालिटी रुग्णालये तात्काळ सुरू करण्यात यावीत. छत्रपती संभाजीनगर व लातूरसुपर स्पेशालिटी रुग्णालयासंदर्भातील कार्यवाहीही तातडीने  करण्याचे निर्देश उपाध्यक्ष श्री. बनसोडे यांनी दिले.


 Give Feedback



 जाहिराती