सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई; घेतलेले पैसे वसूल होणार!
  • मनसेची साथ सोडा, मुंबईत आमच्यासोबत या; काँग्रेसची उद्धव ठाकरेंना ऑफर
  • दुबई एअर शोमध्ये तेजस लढाऊ विमान कोसळलं; स्फोटानंतर धुराचे लोट, पायलटबाबत अद्याप अनिश्‍चितता
  • भाजपने कुटुंब कल्याण योजना राबवली, त्यांच्याच जागा बिनविरोध कशा होतात? रोहित पवारांचा हल्लाबोल
  • बांगलादेशात भूकंपात 6 जणांचा मृत्यू, 200 जखमी; 10 मजली इमारत झुकली, आयर्लंड-बांगलादेश क्रिकेट सामना थांबवला
 जिल्हा

मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा गैरवापर करणाऱ्यांवर कारवाई; घेतलेले पैसे वसूल होणार!

डिजिटल पुणे    21-11-2025 17:10:22

मुंबई –   लाडकी बहीण योजनेचा  गैरफायदा घेणाऱ्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई होणार असल्याची माहिती समोर आली आहे. ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा फायदा घेतला आहे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. सोबतच घेतलेले पैसे वसूल केले जाणार आहे, मात्र वेतनवाढ ही रोखली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अडीच कोटी लाडक्या बहिणींची  केवायसी सुरू केल्यानंतर अनेक बाबी समोर आल्या आहेत. राज्यातील लाडकी बहीण योजनेचा गैरफायदा घेतलेल्या सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आता कारवाईची प्रक्रिया सुरू झाली आहे. महिला व बालविकास विभागाने अशा कर्मचाऱ्यांना पत्र पाठवण्याची तयारी केली असून, त्यांच्याकडून मिळालेली रक्कम वसूल केली जाणार आहे. यासोबतच त्यांच्या पगारवाढीवरही काही काळासाठी गंडांतर येण्याची शक्यता आहे.

KYC नंतर उघड झालं सत्य

लाडकी बहीण योजनेंतर्गत लाभ घेतलेल्या कर्मचाऱ्यांची छाननी केली जात आहे. पुढील महिनाभरात हे कर्मचारी कोणकोणत्या विभागातील आहेत हे स्पष्ट होईल, त्यानंतर त्या त्या विभागांना यासंदर्भातील पत्र पाठवण्यात येणार आहे. अशा कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. त्यांच्याकडून पैसे तर वसूल केले जाणारच आहेत, शिवाय त्यांची पगारवाढही रोखली जाण्यासंदर्भात कारवाई केली जाणार आहे. याविषयीचे पत्र महिला व बालविकास विभागाकडून संबंधित कर्मचाऱ्यांना दिले जाणार आहे.अधिक उत्पन्न असतानाही योजनेचा लाभ

 पाच लाख महिला लाभार्थींनी कुटुंबांची उत्पन्न मर्यादा अधिक

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी उत्पन्नाची मर्यादा अडीच लाख असली तरी अधिक उत्पन्न असलेल्या नागरिकांनीही निवडणूक काळातील गडबडीचा लाभ घेत या योजनेचे रक्कम लाटल्याचा प्रकार समोर आला आहे. अशा सुमारे पाच लाख महिला लाभार्थींनी कुटुंबांची उत्पन्न मर्यादा अधिक असूनही लाडकी बहीणचे पैसे लाटले आहेत. त्यांना या योजनेतून वगळण्यात आले आहे.

 १ काेटी ३० लाख महिलांचे ईकेवायसी

आत्तापर्यंत राज्यातील लाडकी बहीण योजनेसाठी पात्र असलेल्या अडीच कोटी महिलांपैकी आतापर्यंत १ कोटी ३० लाख महिलांचे ईकेवायसी पूर्ण झाले आहे. अद्यापही १ कोटीवर महिलांचे ईकेवायसी पूर्ण झालेले नाही. त्यांच्यासाठी ३१ डिसेंबरची मुदतवाढ देण्यात आली आहे. एवढ्या वेळेत ईकेवायसी पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र त्याही वेळेत ईकेवायसी पूर्ण न झाल्यास पुढील निर्णय घेतला जाईल. त्याचप्रमाणे ज्या महिलांचे पती किंवा वडील दोघेही हयात नाहीत, त्यांनी त्यांचे मृत्यूपत्र अंगणवाडी सेविका कार्यालयात दिल्यास त्यांनाही आपले ईकेवायसी पूर्ण करून या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त मिळकत असतानाही लाभ

योजनेसाठी उत्पन्नमर्यादा ₹२.५ लाख असताना, निवडणूक काळातील गोंधळाचा फायदा घेत सुमारे ५ लाख महिलांनी जास्त उत्पन्न असूनही या योजनेचे पैसे घेतल्याचे दिसून आले आहे. अशा सर्वांना योजनेतून तात्काळ वगळण्यात आले आहे.

e-KYC साठी मुदतवाढ

पूरस्थिती आणि इतर अडचणींमुळे अनेक महिलांचे e-KYC पूर्ण झाले नव्हते. त्यामुळे पूर्वीची 18 नोव्हेंबरची अंतिम तारीख वाढवून आता 31 डिसेंबर 2024 अशी नवीन मुदत जाहीर केली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती सोशल मीडियावर दिली.

विशेष सवलत – पती किंवा वडील हयात नसल्यास

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या ज्या महिलांचे ई केवायसी अद्याप झालेलं नाही त्यांच्यासाठी आता महत्त्वाची बातमी आहे. या योजनेच्या ई केवायसी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. या आधी 18 नोव्हेंबर पर्यंत ई केवायसी करणं बंधनकारक करण्यात आलं होतं. आता त्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरेंनी त्यांच्या सोशल मीडियावरुन या निर्णयाची माहिती दिली आहे.

राज्यातील काही भागात पूराची स्थिती निर्माण झाल्यामुळे, तसेच इतर अडचणींमुळे अनेक लाभार्थी महिलांना ई केवायसी करता आलं नव्हतं. अशा महिलांसाठी आता पुन्हा एकदा मुदतवाढ देण्यात आली आहे.


 Give Feedback



 जाहिराती