उरण : उरण नगर परिषद ची निवडणूक २ डिसेंबर २०२५ रोजी तर निकाल ३ डिसेंबर रोजी लागणार आहे. सर्वच पक्षाचे इच्छुक नगरसेवक पदाच्या उमेदवारांनी अचूक रणनीती ठरवत आपआपल्या प्रचाराला सुरुवात केली आहे. सर्वच पक्षांनी या निवडणुकीत उडी घेतली असून डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या व राज्यात सर्वत्र कानाकोपऱ्यात असलेल्या बहुजनाचे पक्ष म्हणून ओळखला जाणाऱ्या व फुले शाहू आंबेडकरी विचार धारेवर चालणाऱ्या वंचित बहुजन आघाडी या पक्षातर्फे प्रभाग क्रमांक २ ब ( मोरा ) मधून वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवार अंजली तुकाराम खंडागळे या निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
राज्यात अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव असून प्रकाश आंबेडकर यांना मानणारा वर्गही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहे.वंचितच्या वतीने अंजली तुकाराम खंडागळे यांनी नगरसेविका पदासाठी अर्ज भरला असून अंजली तुकाराम खंडागळे यांचे पती तुकाराम खंडागळे हे गेली अनेक वर्ष वंचित बहुजन आघाडीचे उरण तालुका अध्यक्ष पदावर आहेत. उरण मध्ये वंचित बहुजन आघाडीचे विचार व कार्याचा त्यांनी तळागाळात प्रसार व प्रचार केला.पक्षाची ध्येय धोरणे शेवटच्या घटकापर्यंत सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवली. त्यामुळे त्यांच्या कार्याची पोहोचपावती म्हणून अंजली तुकाराम खंडागळे यांना वंचितच्या वतीने उरण नगरपरिषद निवडणुकीमध्ये नगरसेविका पदासाठी उमेदवारी देण्यात आली.अंजली खंडागळे यांना विविध समस्यांची चांगली जाणीव असून सर्वांच्या सुख दुःखात धावणाऱ्या महिला सामाजिक कार्यकर्त्या आहेत.
वंचित बहुजन आघाडीचे गेली अनेक वर्षे त्या प्रामाणिकपणे, एक निष्ठेने, निस्वार्थीपणाने काम करीत आहेत.त्यामुळेही त्यांना नगर सेवक पदासाठी वंचित तर्फे उमेदवारी देण्यात आली आहे.नगरसेविका पदासाठी अंजली खंडागळे यांनी आपला प्रचार सुरू केला असून त्यांना जनतेचा, नागरिकाचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. महिला उमेदवार असल्याने स्त्री वर्गाचा मोठा पाठिंबा अंजली खंडागळे यांना मिळत आहे.वंचित बहुजन आघाडीच्या नगरसेविका पदाच्या अधिकृत उमेदवार अंजली तुकाराम खंडागळे या नगरसेविका म्हणून निवडून येण्यासाठी उरण तालुक्यातील व उरण शहरातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.