उरण : शाळेकडून झालेल्या जडणघडणीची जाणीव ठेवून माजी विद्यार्थ्यांकडून शाळेबद्दल ऋण व्यक्त करण्यासाठी शाळेच्या विकासात महत्वाचा हातभार लावत असतात. या माजी विद्यार्थ्यांच्या सहयोगातून शाळेच्या गुणवत्ता विकासास अधिक चांगल्या प्रकारे चालना मिळू शकते.त्यासाठी तु. ह. वाजेकर उच्च माद्यमिक विदयालय, फुंडे चेअरमन कृष्णाजी कडू यांच्या अध्यक्षतेखाली माजी विद्यार्थी संघाची स्थापना करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य बी. बी. साळुंखे यांनी केले. विद्यालय स्थापने पासून आज पर्यंतच्या वैशिष्ट्यपूर्ण बाबी सांगितल्या. तसेच विद्यालया मध्ये माजी विद्यार्थी संघ का स्थापन करावा त्याचा उद्देश काय याबद्दल माहिती दिली.
उपस्थितांच्या स्वागता नंतर गोपाल पाटील, दिपक ठाकूर, भार्गव पाटील यांनी आपले अनुभव सांगत, शाळा उत्कर्षा कडे वाटचाल करत असताना आपले सर्वांचे योगदान असणे गरजेचे आहे असे सांगितले. त्या नंतर माजी विद्यार्थी संघाची नवीन कार्यकारिणी स्थापन करण्यात आली. अध्यक्ष भार्गव पाटील, उपाध्यक्ष दीपक ठाकूर, सचिव - प्राचार्य बी. बी. साळुंखे, सल्लागार मच्छिंद्र घरत, कोषाध्यक्ष सुरज ठाकूर, निवृत्त शिक्षक आर. पी. ठाकूर, सदस्य गोपाल पाटील, कुणाल पाटील यांची निवड झाली. या सभेस एच. एम. धुरी, उपशिक्षिका एस. जे. माळी व इतर सेवक उपस्थित होते. उपस्थितांचे स्वागत विद्यालयाचे लेखनिक नवनीत ठाकूर यांनी केले व आभार एस.डी. म्हात्रे यांनी मानले.