उरण :श्रीमदपुरुषार्थ ग्रंथामध्ये सांगितल्या प्रमाणे रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. कारण परमात्म्याला आवडणाऱ्या ९ थेंबा पैकी एक थेंब म्हणजेच रक्ताचा थेंब आहे. ह्या दानामुळे परमात्म्याची कृपा प्राप्त होते व पुण्यसंचयही होतो. या विचारनुसार श्री अनिरुद्ध उपासना फाउंडेशन व दिलासा मेडिकल ट्रस्ट व सद्गुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र उरण मुळेखंड तर्फे उरण नगर पालिका शाळा नंबर १ उरण शहर येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.सामाजिक बांधिलकी जपत आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरात एकूण १७६ रक्तदात्यांनी भाग घेतला त्यामध्ये २३ रक्तदाते काही कारणास्तव रिजेक्ट करण्यात आले.जे रक्तदाते आले होते त्यांचे आयोजकांच्या वतीने स्वागत करून आभार मानण्यात आले.एकंदरीत १५३ जणांनी रक्तदान केले.