सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • बॉलिवूडचा 'ही-मॅन' काळाच्या पडद्याआड; सुपरस्टार धर्मेंद्र यांच निधन, 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
 शहर

विंग कमांडर अभय जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रम

डिजिटल पुणे    24-11-2025 12:26:27

पुणे: धारेश्वर कला व क्रीडा प्रतिष्ठान, एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशन आणि जतन फाउंडेशन फॉर इंक्लूजन यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान दिन तसेच विंग कमांडर अभय जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त शिष्यवृत्ती वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दि. २५ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता धारेश्वर प्रतिष्ठान,धायरी येथे होणार आहे.विंग कमांडर अभय जोशी आरोग्य व शिक्षण निधी अंतर्गत देण्यात येणाऱ्या या शिष्यवृत्तीमुळे गुणवंत आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीची नवी संधी उपलब्ध होणार आहे.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. प्रदीप आवटे हे उपस्थित राहणार असून सामाजिक कृतज्ञता निधीचे कार्याध्यक्ष आणि संविधान अभ्यासक सुभाष वारे मार्गदर्शन करणार आहेत. विंग कमांडर अभय जोशी आरोग्य व शिक्षण निधीच्या प्रवर्तक श्रीमती ज्योती जोशी यांचीही उपस्थिती असणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी धारेश्वर कला व क्रीडा प्रतिष्ठान चे अध्यक्ष काका चव्हाण असणार आहेत.

 अनिकेत चव्हाण(संचालक धारेश्वर कला क्रीडा प्रतिष्ठान), सुजाता कडू, (प्राचार्य धारेश्वर इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग), रविंद्र झेंडे(संचालक जतन फाउंडेशन फॉर इंक्लूजन) यांनी विद्यार्थ्यांसह सर्व समाजबांधवांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.


 Give Feedback



 जाहिराती