सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • बॉलिवूडचा 'ही-मॅन' काळाच्या पडद्याआड; सुपरस्टार धर्मेंद्र यांच निधन, 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
 DIGITAL PUNE NEWS

धर्मेंद्रंच्या शेवटच्या चित्रपटातील व्हॉईस नोट व्हायरल झाली अन् काहीवेळातच घराबाहेर अॅम्बुलन्स पाठोपाठ निधनाची बातमी, नेमकं काय घडलं?

डिजिटल पुणे    24-11-2025 16:32:46

मुंबई : बॉलिवूडचे ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचं सोमवारी सकाळी निधन झालं. वयाच्या 88व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्या निधनाच्या काही तास आधीच त्यांच्या शेवटच्या चित्रपट इक्कीस मधील मोशन पोस्टर आणि व्हॉईस नोट सोशल मीडियावर व्हायरल झाली होती, ज्यामुळे चाहत्यांमध्ये भावूक वातावरण पसरलं होतं.

बॉलिवूडचा 'ही-मॅन' धर्मेंद्र यांचं निधन झालंय. सोमवारी सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मीडिया रिपोर्टनुसार, अभिनेत्याची प्रकृती अचानक बिघडली आणि त्यातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सोमवारी दुपारी साधारणतः साडेबाराच्या सुमारास एक रुग्णवाहिका धर्मेंद्र यांच्या राहत्या घरी आली, त्याचवेळी धर्मेंद्र यांची प्रकृती नाजूक असल्याच्या चर्चांना उधाण आलं. अशातच अर्ध्या तासांतच रुग्णवाहिका धर्मेंद्र यांच्या घरातून बाहेर आली, त्यावेळी सर्वांना धक्काच बसला. रुग्णवाहिकेत धर्मेंद्र यांचं पार्थिव होतं, जे विलेपार्ले येथील पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी नेण्यात आलं.  त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासांतच धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  

सुपरस्टारला अखेरचा निरोप देण्यासाठी अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. त्यांच्यावर त्यांचा मोठा मुलगा सनी देओल यांनी अंत्यसंस्कार केले. धर्मेंद्र यांच्या निधनानंतर देओल कुटुंबीयांकडून अद्याप कोणतंही अधिकृत निवेदन जारी केलेलं नाही. अशातच अनेक दिग्गज धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी स्मशानभूमीत पोहोचलेले.

 

अॅम्बुलन्स दिसताच चर्चांना उधाण

दुपारी साधारण साडेबारा वाजता धर्मेंद्र यांच्या जुहू येथील राहत्या घरी एक रुग्णवाहिका पोहोचली. त्याचवेळी त्यांच्या प्रकृतीबाबत गंभीर अडचणी असल्याच्या चर्चांनी वेग घेतला. अवघ्या अर्ध्या तासातच अॅम्बुलन्स घरातून बाहेर निघाली आणि त्यात धर्मेंद्र यांचे पार्थिव असल्याचे स्पष्ट झाले.

पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार

अॅम्बुलन्स थेट विलेपार्लेतील पवनहंस स्मशानभूमीकडे रवाना झाली. तेथे अनेक सेलिब्रिटींनी उपस्थित राहून सुपरस्टारला अखेरचा निरोप दिला. धर्मेंद्र यांच्यावर अंत्यसंस्कार त्यांचे मोठे चिरंजीव सनी देओल यांनी केले. अद्याप देओल कुटुंबाकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आलेले नाही.

प्रकृती ढासळल्यामुळे घरीच उपचार सुरू

12 नोव्हेंबर रोजी देओल कुटुंबाच्या विनंतीवरून धर्मेंद्र यांना ब्रीच कॅंडी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर त्यांच्या जुहूतील निवासस्थानीच उपचार सुरू होते. त्यांची प्रकृती हळूहळू सुधारत असल्याची माहिती मिळत असतानाच आज सकाळी हृदयद्रावक बातमी समोर आली.

शेवटच्या चित्रपटाची व्हॉईस नोट व्हायरल

सोमवारीच धर्मेंद्र यांच्या शेवटच्या चित्रपट *‘इक्कीस’*मधील नव्या मोशन पोस्टरचं अनावरण करण्यात आलं. या पोस्टरसोबतची त्यांची व्हॉईस नोट सोशल मीडियावर क्षणात व्हायरल झाली.त्यात धर्मेंद्र म्हणतात:“मेरा बड़ा बेटा अरुण… ये हमेशा इक्कीस का ही रहेगा…”चित्रपटात धर्मेंद्र यांनी 21 वर्षीय शहीद सेकंड लेफ्टिनंट अरुण खेत्रपाल (अगस्त्य नंदा) यांच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. मॅडॉक फिल्मने हे मोशन पोस्टर शेअर करताना लिहिले“वडील मुलांचं संगोपन करतात, महापुरुष राष्ट्र घडवतात.”त्यांच्या आवाजासोबतच काही तासांत आलेल्या निधनाच्या बातमीने संपूर्ण देशातील चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.


 Give Feedback



 जाहिराती