सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • बॉलिवूडचा 'ही-मॅन' काळाच्या पडद्याआड; सुपरस्टार धर्मेंद्र यांच निधन, 89 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
 DIGITAL PUNE NEWS

ही-मॅन’ची एक्झिट वेदनादायक ;सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांची ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली

डिजिटल पुणे    24-11-2025 17:48:26

मुंबई : भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते, पद्मभूषण धर्मेंद्र यांच्या निधनाची बातमी अत्यंत वेदनादायक आहे, अशा शोकभावना व्यक्त करत माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी धर्मेंद्र यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.त्यांच्या देखण्या व्यक्तिमत्त्वाने, प्रभावी संवादशैलीने आणि हृदयाला भिडणाऱ्या अभिनयाने त्यांनी भारतीय सिनेमाला एक वेगळे स्थान प्राप्त करून दिले. 300 हून अधिक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारत त्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आणि बॉलिवूडचा ही-मॅन अशी एक वेगळी ओळख प्रस्थापित केली.आज जरी एक सुवर्णयुग संपले असले, तरी धर्मेंद्र यांच्या अभिनयाची आणि संस्कारांची अमिट छाप सदैव आपल्या स्मरणात राहील. ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो, अशा शब्दांत मंत्री ॲड. शेलार यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.


 Give Feedback



 जाहिराती