सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचा शब्द
  • माझ्या मुलीची हत्या केली, नंतर आत्महत्या दाखवली; गौरी पालवेच्या वडिलांचा आरोप, पंकजा मुंडेंच्या पीएच्या अडचणी वाढल्या
  • पोर्टेबल सोनोग्राफी यंत्राने कारमध्येच गर्भलिंग निदान केलं, नाशिकमध्ये बड्या डॉक्टरला पोलिसांनी ठोकल्या बेड्या, वैद्यकीय क्षेत्रात खळबळ
  • धक्कादायक! निवडणुकीसाठी 10 लाख घेऊन ये म्हणत विवाहितेचा छळ, महिलेचं टोकाचं पाऊल; कोल्हापुरात खळबळ
 जिल्हा

अंग भाजल्याने दाखल; यातना असह्य झाल्याने तरुणाची रुग्णालयाच्या छतावरून उडी – भंडाऱ्यात खळबळ

डिजिटल पुणे    25-11-2025 14:48:44

भंडारा : अंग भाजल्यानंतर उपचारासाठी दाखल करण्यात आलेल्या 23 वर्षीय तरुणाने मानसिक तणाव वाढल्यानं जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या छतावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (24 नोव्हेंबर) घडली. अखिल मरसकोल्हे (रा. तीरोडी, मध्यप्रदेश) असे मृत तरुणाचे नाव आहे.

माहितीनुसार, अंग भाजल्याने होणाऱ्या असह्य वेदनांमुळे त्याची मानसिक अवस्था ढासळत चालली होती. मंगळवारी सकाळी तो अचानक वॉर्डमधून बाहेर पडला आणि थेट रुग्णालयाच्या इमारतीच्या छतावर गेला. काही क्षणांतच सुमारे 40 ते 50 फूट उंचीवरून खाली पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तातडीने ICU मध्ये हलवूनही प्रचंड रक्तस्रावामुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

नेमकं घडलं काय?

अखिल मरसकोल्हे या तरुणाचं अंग भाजल्यामुळे त्याला  भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आलं  होतं.मात्र, वेदना असह्य झाल्याने तरुण  मानसिक तणावाखाली गेला. त्याची मानसिक अवस्था ढासळत चालली होती. मंगळवारी सकाळी रुग्ण अचानक वॉर्डमधून बाहेर पडला आणि थेट जिल्हा रुग्णालयाच्या छतावर गेला.अंदाजे 40 ते 50 फूट उंचीवरून पडल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात हलवण्यात आलं. मात्र, प्रचंड रक्तस्राव आणि गंभीर मेंदूच्या जखमेमुळे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी पंचनामा करून या प्रकरणात मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास सुरू आहे. घटना घडताच रुग्णालय परिसरात एकच गोंधळ उडाला होता.

कर्मचारी, रुग्ण आणि नातेवाईकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान,रुग्णाच्या उडी मारण्याचा थरार दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आल्याने खळबळ उडालीय. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये तरुण इमारतीच्या कठड्याला लटकलेला दिसतो. खाली त्याचे नातेवाईक व आजूबाजूचे लोक थांबलेले होते. तरुण उडी मारण्याच्या बेतात असल्याचं लक्षात येताच इमारतीखाली अनेक लोक जमले. मोठी खळबळ उडाली. पण त्याच क्षणी रुग्णाने आपला हात सोडून दिला. क्षणार्धात खाली कोसाल्याने तरुणाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्याला खाली जमलेल्या लोकांनी रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी त्याला ICU मध्ये ठेवले. मात्र, जखम इतकी गंभीर होती की रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला

 


 Give Feedback



 जाहिराती