पुणे : अल्पसंख्याक समुदायावरील वाढत्या अत्याचारांच्या विरोधात तसेच १८ डिसेंबर अल्पसंख्याक हक्क दिवस साजरा करण्याबाबत प्रशासनाकडून नेहमी होत असलेल्या उदासीनतेच्या निषेधार्थ सौ. मुबिना अहमद खान यांच्या नेतृत्वाखाली आज पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. या आंदोलनादरम्यान शासनाने अल्पसंख्याकांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष द्यावे आणि अल्पसंख्यांक हक्क दिनाच्या निमित्ताने संवेदनशील भूमिका घ्यावी, अशी मागणी करण्यात आली. त्यानंतर या मागण्यांचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी ज्योती कदम यांना देण्यात आले.
आंदोलनासाठी शेकडो अल्पसंख्याक बांधव संख्येने उपस्थित होते. इनक्रेडीबल समाज सेवक ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष असलम इसाक बागवान, पुणे शहराध्यक्ष राजू सय्यद, महाराष्ट्र समन्वयक सचिन आल्हाट, एएसके ग्रुपचे अध्यक्ष अहमद समद खान, शाहिन सिंदगी आणि इतर पदाधिकारी उपस्थित राहून या आंदोलनाला सक्रिय पाठिंबा दिला.आंदोलनाद्वारे अल्पसंख्याक समाजाच्या हक्कांची अंमलबजावणी, वाढत्या अत्याचारांवर नियंत्रण आणि शासनाकडून ठोस उपाययोजना करण्याची मागणी ठामपणे मांडण्यात आली.