वसई : वसईच्या नायगाव परिसरात चोरट्यांच्या साखळी चोरीच्या घटनांमध्ये भर घालत सोमवारी आणखी एक धक्कादायक प्रकार घडला. अमोल नगर स्थित निलांबर सोसायटीमध्ये मदतीच्या नावाखाली एका घराच्या पहिल्या मजल्यावर गेलेल्या अज्ञात तरुणाने घरात एकटी असलेल्या महिलेची सोन्याची चेन हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला. वसईच्या नायगाव परिसरात सोमवारी साखळी चोरीचा प्रयत्न अपयशी ठरला. अमोल नगरमधील निलांबर सोसायटीत मदतीच्या बहाण्याने एका घराच्या पहिल्या मजल्यावर गेलेल्या अज्ञात इसमाने घरात एकटी असलेल्या महिलेची सोन्याची चेन हिसकावण्याचा प्रयत्न केला. मात्र, महिलेने प्रसंगावधान राखत चोरट्याशी झटापट केली आणि हार न मानता त्याचा पाठलाग सुरूच ठेवला.
इमारतीबाहेर पळत असताना त्या महिलेने चोरट्याला पकडण्यात यश मिळवले. धाडसी महिलेच्या या कृतीचे सोसायटीतील सर्वांनी कौतुक केले आहे.महिलेने चोरटा पकडताच रहिवासीही मदतीला धावून आले. त्यांनी चोरट्याचे हात बांधून त्याला चांगलाच चोप दिला आणि तत्काळ पोलिसांच्या ताब्यात सुपूर्द केले.दिवसा-दिवसा सोसायट्यांमध्ये चोरीचे प्रकार वाढत असून यामुळे नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. परिसरात पोलिस गस्त वाढवण्याची मागणीही जोर धरत आहे. पोलिस तपास सुरू असून आरोपीकडून इतर गुन्ह्यांचा तपास होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.