सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • आयआयटी मुंबई की आयआयटी बॉम्बे? भाजप मंत्र्याच्या वक्तव्यानंतर वाद वाढणार अन् राजकारण तापणार
  • : राणीच्या बागेत वाघाचा संशयास्पद मृत्यू, श्वसननलिकेत हाड अडकलं, उपचार न मिळाल्याने जीव सोडला?
  • नागपूरच्या काटोलमध्ये 34 किलो गांजा जप्त, भाजप युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षाला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ
  • राज्यात 50 टक्के आरक्षण लागू झालं तर भविष्यात ओबीसींचं राजकीय आरक्षण शून्यावर येईल; बबनराव तायवाडेंकडून धोक्याचा इशारा
  • मुंबईत 11 लाख दुबार मतदार, निवडणूक आयोगाने केलं मान्य एका व्यक्तीचं नाव तब्बल 103 वेळा, ठाकरे बंधूंचा दावा खरा ठरला
 शहर

पुण्यात चालले तरी काय? चक्क एका महिलेने पुरुषावर अत्याचार केल्याची घटना उघड

डिजिटल पुणे    26-11-2025 17:53:16

पुणेः  पुण्यात एका महिलेने पुरुषावर अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिलेने गुंगीचे औषध देऊन कोल्हापूरच्या एका पुरुषावर अत्याचार केल्याचे आणि त्याचे अश्लील फोटो काढून पैशांची मागणी केल्याचे वृत्त आहे. आरोपी महिला वकील असल्याची बतावणी करत धमकी देत होती. पीडित व्यक्तीच्या घरीही बळजबरीचा प्रयत्न करण्यात आला आणि त्याला काशी विश्वनाथ येथे घेऊन जाऊन अत्याचार केल्याची माहिती आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.

पुण्यात पुन्हा एक सनसनाटी घटना समोर आली आहे. कोथरुड परिसरात एका महिलेने तरुणाला गुंगी आणणारे औषध देऊन जबरदस्ती केल्याचा गंभीर आरोप झाला आहे. पीडित तरुणाने पोलिसांकडे दिलेल्या माहितीप्रमाणे, आरोपी महिला स्वतःला वकील असल्याचे सांगत कायद्याचे भय दाखवत त्या तरुणाला सतत धमकावत होती.

गुंगीच्या अवस्थेत त्याच्यावर अत्याचार करून तिने त्याचे खाजगी फोटो काढले आणि तेच फोटो व्हायरल करण्याची धमकी देत पैशांची मागणी सुरू केली. या मानसिक छळामुळे तरुण प्रचंड तणावाखाली होता.

घटना केवळ पुण्यातच न थांबता आरोपी महिला त्याच्या कोल्हापूरच्या घरीही पोहोचली. एवढेच नाही तर वाराणसी येथेही त्याला नेऊन दबाव टाकल्याचे तरुणाने तक्रारीत नमूद केले आहे.तक्रार मिळताच कोथरूड पोलिसांनी महिलेविरुद्ध गुंगीचे औषध देणे, जबरदस्ती करणे, फोटोद्वारे ब्लॅकमेल करणे आणि धमक्या देणे अशा गंभीर कलमांनुसार गुन्हा नोंदवला आहे. प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.


 Give Feedback



 जाहिराती