सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • आयआयटी मुंबई की आयआयटी बॉम्बे? भाजप मंत्र्याच्या वक्तव्यानंतर वाद वाढणार अन् राजकारण तापणार
  • : राणीच्या बागेत वाघाचा संशयास्पद मृत्यू, श्वसननलिकेत हाड अडकलं, उपचार न मिळाल्याने जीव सोडला?
  • नागपूरच्या काटोलमध्ये 34 किलो गांजा जप्त, भाजप युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षाला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ
  • राज्यात 50 टक्के आरक्षण लागू झालं तर भविष्यात ओबीसींचं राजकीय आरक्षण शून्यावर येईल; बबनराव तायवाडेंकडून धोक्याचा इशारा
  • मुंबईत 11 लाख दुबार मतदार, निवडणूक आयोगाने केलं मान्य एका व्यक्तीचं नाव तब्बल 103 वेळा, ठाकरे बंधूंचा दावा खरा ठरला
 जिल्हा

सुधागड इजूकेशन सोसायटी शाळेला आदर्श शाळा पुरस्कार

विठ्ठल ममताबादे (प्रतिनिधी )    27-11-2025 12:16:15

उरण : चाईल्ड केअर सामाजिक संस्था रायगडचे संस्थापक अध्यक्ष विकास कडू यांच्या नेतृत्वा खाली ९ वर्ष समाज सेवेचे उपक्रम राबवत आहे.आज आदर्श शाळा तालुका हा उपक्रम हाती घेऊन रायगड जिल्हातील प्रत्येक तालुक्यात आदर्श शाळा निवडत आहे त्या प्रमाणे पनवेल तालुका मधून सुधागड एज्युकेशन सोसायटी ह्या शाळेला पनवेल तालुका आदर्श शाळा पुरस्कार देण्यात आला.सदर पुरस्कार आवाज महामुंबईचा न्यूज चैनल चे संपादक  मिलिंद खारपाटील (सल्लागार )यांच्या शुभ हस्ते शाळेच्या मुख्याध्यापिका गावित मॅडम यांनी स्वीकारले तेव्हा आमच्या प्रतिनिधी सोबत बोलताना गावित मॅडम म्हणाल्या  की "आत्ता पनवेल तालुक्यातून आमच्या शाळेला आदर्श शाळा  म्हणून पुरस्कार मिळाला त्या बद्दल मी चाईल्ड केअर सामाजिक संस्था रायगड चे आभारी आहोत आणी या पुढे आमची  जबाबदारी वाढेल व शाळेतील मुलांसाठी आणखी काही जास्तीत जास्त विकास कसा होईल.

  ह्या गोष्टीवर भर देण्यात येईल" तसेच या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून  संतोष तांबोळी ( माजी सरपंच), संतोष गायकर (माजी उपसरपंच), वैभव गायकर (पत्रकार)जेष्ठ नागरिक  सीताराम म्हात्रे (मीडिया सल्लगार )यांची उपस्थिती होती. तर शाळे तर्फे नूतन जगताप , बाळासाहेब सोलासे , प्रकाश पाटील , लक्ष्मण इगोले , सुप्रिया लांडगे , जयसिंग थोरात , संतोष पाटील , सुनील निकुंभ, वैशाली पाटील , संगीता मगरे , जाकीरहुसेन मान्सूरी  व कर्मचारी उपस्थितीत होते.तर संस्थेतर्फे संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष विकास कडू, कु विनायक म्हात्रे (पनवेल तालुका अध्यक्ष), साजन वास्कर (पनवेल तालुका उपाध्यक्ष)कु. मयुरेश करमेलकर (प्रसिद्धी प्रमुख रायगड) कु.अभिषेक माळी सदस्य, कु. विवेक कडू सदस्य हे उपस्थित होते.कार्यक्रम चे प्रास्ताविक  विकास कडू यांनी केले ते बोलताना म्हणाले "सुधागड इजूकेशन सोसायटी ही एक शाळा नसून एक कुटूंब आहे, कारण शाळेत मुलांच्या शिक्षणा ची खूप चांगल्या प्रमाणात काळजी घेतली जाते.

विशेषता सुरक्षा च्या बाबतीत मुलाच्या शारीरिक विकास अर्थात खेळा कडे,मुलांना सुसज्य सायन्स लॅब, नीट नेटके ग्रंथलंय या सारख्या अनेक सोयी आहेत आज वर या शाळेला कुठलाही गालबोट लागलेला नाही म्हणून पनवेल तालुक्यातील ही आदर्श शाळा आहे म्हणूनच आमच्या संस्थे ने  या शाळेला आदर्श शाळा पनवेल हा पुरस्कार देण्याचे ठरवले "तर आभार प्रदर्शन कु विनायक म्हात्रे यांनी केले. शाळेतर्फे चाईल्ड केअर सामाजिक संस्थाच्या पदाधिकाऱ्याचे मुख्याध्यापक मॅडम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले.


 Give Feedback



 जाहिराती