सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • आयआयटी मुंबई की आयआयटी बॉम्बे? भाजप मंत्र्याच्या वक्तव्यानंतर वाद वाढणार अन् राजकारण तापणार
  • : राणीच्या बागेत वाघाचा संशयास्पद मृत्यू, श्वसननलिकेत हाड अडकलं, उपचार न मिळाल्याने जीव सोडला?
  • नागपूरच्या काटोलमध्ये 34 किलो गांजा जप्त, भाजप युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षाला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ
  • राज्यात 50 टक्के आरक्षण लागू झालं तर भविष्यात ओबीसींचं राजकीय आरक्षण शून्यावर येईल; बबनराव तायवाडेंकडून धोक्याचा इशारा
  • मुंबईत 11 लाख दुबार मतदार, निवडणूक आयोगाने केलं मान्य एका व्यक्तीचं नाव तब्बल 103 वेळा, ठाकरे बंधूंचा दावा खरा ठरला
 जिल्हा

फ्लॅश टँकमध्ये मतदार ओळखपत्र सापडल्यासंदर्भात माहिती देण्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांचे आवाहन

डिजिटल पुणे    27-11-2025 15:10:32

मुंबई : मुंबई उपनगर जिल्हयातील अंधेरी भागात टॉयलेट फ्लॅश टँकमध्ये निवडणूक मतदार ओळखपत्र सापडल्याबाबत काही मुद्रित व इलेक्ट्रॉनिक प्रसारमाध्यमांत वृत्त व व्हिडीओ क्लिप प्रसारित झाली आहे. प्रसारित व्हिडीओ क्लिपमधून कोणताही बोध होत नाही. हे वृत्त सोशल मिडिया येथून घेऊन प्रसारित करण्यात आले असल्याचा खुलासा संबधीत माध्यमांनी केला आहे. त्याची चौकशी केली असता घटना कुठे घडली हे स्पष्ट होत नाही. त्यामुळे ही बातमी व व्हिडीओ क्लिपच्या अनुषंगाने २० नोव्हेंबर. २०२५ रोजी डी. एन. नगर पोलीस स्टेशनमध्ये प्रथम खबर अहवाल (FIR-१२१८/२०२५) अज्ञाताविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. तरी देखील या वृत्तातील क्लिपबाबत जर कोणत्याही नागरिकांस माहिती असेल तर त्यांनी निदर्शनास आणून द्यावी. त्याची संपूर्ण चौकशी करण्यात येईल, असे मुंबई उपनगर जिल्ह्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.


 Give Feedback



 जाहिराती