सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • आयआयटी मुंबई की आयआयटी बॉम्बे? भाजप मंत्र्याच्या वक्तव्यानंतर वाद वाढणार अन् राजकारण तापणार
  • : राणीच्या बागेत वाघाचा संशयास्पद मृत्यू, श्वसननलिकेत हाड अडकलं, उपचार न मिळाल्याने जीव सोडला?
  • नागपूरच्या काटोलमध्ये 34 किलो गांजा जप्त, भाजप युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षाला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ
  • राज्यात 50 टक्के आरक्षण लागू झालं तर भविष्यात ओबीसींचं राजकीय आरक्षण शून्यावर येईल; बबनराव तायवाडेंकडून धोक्याचा इशारा
  • मुंबईत 11 लाख दुबार मतदार, निवडणूक आयोगाने केलं मान्य एका व्यक्तीचं नाव तब्बल 103 वेळा, ठाकरे बंधूंचा दावा खरा ठरला
 जिल्हा

आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक सहाय्यता संस्थेच्या अध्यक्षपदाची सूत्रे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याकडे

डिजिटल पुणे    27-11-2025 17:24:41

मुंबई  : भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार  2026 या वर्षासाठी आंतरराष्ट्रीय लोकशाही आणि निवडणूक सहाय्यता संस्था अर्थात इंटरनॅशनल इन्स्टिटयूट फॉर डेमोक्रॅसी अँड इलेक्ट्रोल आसिस्टस (आयडीईए) या आंतर-सरकारी संस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा स्वीकारणार आहेत. 3 डिसेंबर 2025 रोजी स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे होणाऱ्या सदस्य देशांच्या परिषदेत ते औपचारिकरीत्या अध्यक्षपद स्वीकारतील. आगामी वर्षभर ते या संस्थेच्या सर्व महत्त्वाच्या परिषदांचे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत.1995 मध्ये स्थापन झालेली आंतरराष्ट्रीय आयडीईए ही संस्था जगभरातील लोकशाही प्रक्रियेचे बळकटीकरण करण्यासाठी कार्यरत आहे. सध्या 35 देशांचे या संस्थेचे सदस्यत्व असून अमेरिका आणि जपान हे निरीक्षक देश आहेत. समावेशक, लवचिक आणि जबाबदार लोकशाही व्यवस्थांचा प्रसार हा संस्थेचा प्रमुख उद्देश आहे.

अध्यक्षपद मिळणे हा भारताच्या निवडणूक आयोगाच्या जागतिक प्रतिष्ठेचा मोठा सन्मान मानला जात आहे. जगातील सर्वात विश्वसनीय आणि अभिनव निवडणूक व्यवस्थापन संस्थांपैकी एक म्हणून भारताच्या निवडणूक आयोगाची आंतरराष्ट्रीय पातळीवर ओळख आहे. भारत हा आयडीईए चा स्थापक सदस्य असून विविध लोकशाही उपक्रमांमध्ये त्याचे योगदान महत्त्वाचे राहिले आहे.अध्यक्ष म्हणून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा जगातील सर्वात मोठ्या निवडणुकांचे आयोजन करण्यातील भारताचा अनुभव हा संस्थेच्या जागतिक कार्ययोजनेत वापरण्याचा मानस आहे. निवडणूक व्यवस्थापन संस्था यांच्यात ज्ञान-विनिमय, व्यावसायिक नेटवर्किंग आणि पुराव्यावर आधारित जागतिक निवडणूक सुधारणा यांना या सहकार्यातून गती मिळणार आहे.

जवळपास एक अब्ज मतदार असलेल्या भारताची पारदर्शक आणि सुबद्ध निवडणूक प्रक्रिया ही जगासाठी आदर्श मानली जाते. आगामी वर्षभर भारत आपल्या उत्तम पद्धती आणि अनुभव आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध करून देणार आहे.भारतीय निवडणूक आयोगाच्या प्रशिक्षण संस्था (इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमॉक्रसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट (आयआयडीईएम) ) आणि आयडीईए यांच्यात संयुक्त कार्यक्रम, कार्यशाळा आणि संशोधन उपक्रम राबविण्यात येणार आहेत. दिशाभूल करणारी माहिती, निवडणूक हिंसाचार आणि मतदारांचा विश्वास कमी होणे, या जागतिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी ही भागीदारी अधिक प्रभावी ठरणार आहे.

स्थापनेपासून आयआयडीईएम ने भारतासह जगभरातील निवडणूक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. संस्थेने आतापर्यंत 28 देशांबरोबर सामंजस्य करार केले असून 142 देशांतील 3169 निवडणूक अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे.मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या नेतृत्वाखाली इसीआय आणि (आयडीईए) एकत्रितपणे भारताच्या तांत्रिक व प्रशासकीय नवकल्पना आणि सर्वोत्तम पद्धतींचे जागतिक स्तरावर दस्तऐवजीकरण व प्रसार करण्याचे काम पुढे नेणार आहेत, असे भारत निवडणूक आयोगाने एका प्रसिद्धापत्रकाद्वारे कळविले आहे.


 Give Feedback



 जाहिराती