सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • आयआयटी मुंबई की आयआयटी बॉम्बे? भाजप मंत्र्याच्या वक्तव्यानंतर वाद वाढणार अन् राजकारण तापणार
  • : राणीच्या बागेत वाघाचा संशयास्पद मृत्यू, श्वसननलिकेत हाड अडकलं, उपचार न मिळाल्याने जीव सोडला?
  • नागपूरच्या काटोलमध्ये 34 किलो गांजा जप्त, भाजप युवा मोर्चाच्या तालुका अध्यक्षाला अटक, राजकीय वर्तुळात खळबळ
  • राज्यात 50 टक्के आरक्षण लागू झालं तर भविष्यात ओबीसींचं राजकीय आरक्षण शून्यावर येईल; बबनराव तायवाडेंकडून धोक्याचा इशारा
  • मुंबईत 11 लाख दुबार मतदार, निवडणूक आयोगाने केलं मान्य एका व्यक्तीचं नाव तब्बल 103 वेळा, ठाकरे बंधूंचा दावा खरा ठरला
 जिल्हा

संविधान चित्ररथास विभागीय आयुक्त यांच्या हस्ते दाखविली हिरवी झेंडी

डिजिटल पुणे    27-11-2025 18:05:30

नाशिक :  भारतीय संविधान सभेने भारतीय राज्यघटना 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकृत केली त्यानंतर ती 26 जानेवारी 1950 रोजी अंमलात आली. संविधान दिवस प्रत्येक भारतीयांसाठी महत्त्वाचा आहे, भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त  आज विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम व जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या हस्ते संविधान चित्ररथास हिरवा झेंडा दाखवून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातून मार्गस्थ करण्यात आले.यावेळी समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ, सहाय्यक आयुक्त हर्षदा बडगुजर व मुकेश कानडे उपस्थित होते. हा चित्ररथ जिल्ह्यात फिरणार असून यामुळे भारतीय संविधानाचे महत्त्व आणि मूल्ये लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती